AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायकः कोरोना लसीकरणानंतर डॉक्टरचा मृत्यू; इगतपुरीतल्या घटनेने खळबळ, ‘एईएफआय’ समितीच्या अहवालातही स्पष्ट उल्लेख

कोरोना लसीकरणानंतर डॉक्टरचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. डॉ. स्नेहल लुणावत (वय 32) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. विशेष म्हणजे 'एईएफआय' समितीच्या अहवालातही लसीकरणामुळे ही घटना घडल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

धक्कादायकः कोरोना लसीकरणानंतर डॉक्टरचा मृत्यू; इगतपुरीतल्या घटनेने खळबळ, 'एईएफआय' समितीच्या अहवालातही स्पष्ट उल्लेख
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 10:25 AM
Share

नाशिकः कोरोना लसीकरणानंतर डॉक्टरचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. डॉ. स्नेहल लुणावत (वय 32) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. विशेष म्हणजे ‘एईएफआय’ समितीच्या अहवालातही लसीकरणामुळे ही घटना घडल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, डॉ. स्नेहल लुणावत या इगतपुरीतील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अध्यापन करतात. त्या दंतचिकित्सा हा विषय शिकवत असत. त्यांनी 28 जानेवरी रोजी कोरोना लस घेतली होती. कोरोना योद्धा म्हणून त्यांना प्राधान्याने लस देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी त्यावर काही औषधेही दिली. मात्र, त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, एक मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. लसीच्या दुष्परिणामुळेच डॉ. स्नेहल यांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबाने शासनाकडे केली होती. लस कंपनीलाही तसे कळवले. मात्र, त्यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

अहवालात काय म्हटले? लुणावत कुटुंबाचा केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा सुरू होता. त्यानंतर आता ‘एईएफआय’ समितीने अहवाल दिला आहे. त्या अहवालात असे म्हटले आहे की, डॉ. स्नेहल यांचा मृत्यू म्हणजे ‘सिरिअस अॅडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन आहे.’ लसीकरणामुळे ही घटना घडल्याची नोंद असल्याचा निष्कर्ष उपलब्ध आहे. मात्र, त्या बदल होऊ शकतो, असा उल्लेखही करण्यात आला आहे. दरम्यान, डॉ. स्नेहल देशमुख यांचे वडील दिलीप लुणावत आहे औरंगाबमध्ये स्थायिक आहेत. ते एका कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत असून, त्यांना आपल्या मुलींच्या निधनाने धक्का बसला आहे.

नाशिकमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांत वाढ नाशिक महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असून, सध्या 244 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोबतच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या डेंग्यू आणि चिकुन गुन्याच्या साथीचे थैमान काही केला कमी व्हायला तयार नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 703 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 778 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 660 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 48, बागलाण 7, चांदवड 25, देवळा 6, दिंडोरी 30, इगतपुरी 5, कळवण 16, मालेगाव 4, नांदगाव 11, निफाड 114, पेठ 1, सिन्नर 133, त्र्यंबकेश्वर 10, येवला 62 अशा एकूण 472 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 244, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 8 तर जिल्ह्याबाहेरील 23 रुग्ण असून असे एकूण 778 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 10 हजार 109 रुग्ण आढळून आले आहेत.

इतर बातम्याः

‘सीएचएम’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 23 ऑक्टोबरपासून नाशिकमध्ये होणार पेपर

दोन वेळा रद्द झालेल्या आरोग्य विभागाची भरती परीक्षा आता 24 ऑक्टोबरला; 2 हजार 739 रिक्त पदे भरणार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.