Dombivali Assembly election : भाजपच्या बालेकिल्ल्यात रवींद्र चव्हाण यांना कोण देणार तगडं आव्हान
Dombivali Elections 2024 : डोबिवली हा २००९ पासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघातून गेल्या तीन वेळेस भाजपचे रवींद्र चव्हाण निवडून आले आहेत. भाजपकडून ते चौथ्यांदा रिंगणात आहे. रवींद्र चव्हाण यांची या मतदासंघावर मजबूत पकड आहे. सर्व समाजातील लोकांसोबत त्यांचं चांगले संबंध आहे. त्यामुळे त्यांना कोण तगडं आव्हान देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Dombivli Assembly Constituency : २००८ मध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन झालं आणि त्यानंतर डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. २००९ पासून या मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व आहे. भाजपचे विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण येथून प्रतिनिधित्व करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या मतदारसंघावर आरएसएसची मजबूत पकड आहे. त्यामुळे भाजपच्या जवळचा मतदार या मतदारसंघात भाजपला मतदान करतो. या मतदारसंघात कोकणी लोकांची संख्या जास्त आहे. त्यानंतर गुजरात, मारवाडी आणि उत्तर भारतीय लोकं आहेत. हे देखील भाजपला मतदान करतात. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत डोंबिवली मतदारसंघात अनेक जण उभे होते. पण २०१९ मध्येही भाजप, काँग्रेस आणि मनसे अशी तिहेरी लढत झाली होती. आता...
