AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivli : शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही; शाळकरी मुलांच्या वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर

चार रस्ता येथे शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी रिक्षा उलटल्याने अपघात झाला. मात्र इतर नागरिकांनी सतर्कता दाखवत ती रिक्षा लगेच थांबवल्याने मोठे नुकसान वा जीवितहानी झाली नाही.

Dombivli :  शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही; शाळकरी मुलांच्या वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर
| Updated on: Dec 20, 2023 | 3:03 PM
Share

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 20 डिसेंबर 2023 : डोंबिवली पूर्वेकडील चार रस्ता येथे शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी रिक्षा उलटल्याने अपघात झाला. मात्र इतर नागरिकांनी सतर्कता दाखवत ती रिक्षा लगेच थांबवल्याने मोठे नुकसान झाले नाही. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून विद्यार्थीही सुखरूप आहेत. रिक्षा चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा पलटली , रिक्षा चालक रिक्षेच्या बाहेर फेकला गेला. मात्र स्थानिक नागरिकांनी धाव घेत रिक्षा थांबवत रिक्षेत असलेल्या तिन्ही मुलांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान या प्रकरणी प्रकरणी वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकवर कारवाई करत त्याला 8 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

अपघात झाला तेव्हा रिक्षामध्ये अवघी तीन मुलं होती पण एरवी या रिक्षा तब्बल 11 मुलं असतात अशी माहिती समोर आली आहे. एवढ्या लहान मुलांना, मोठ्या प्रमाणात रिक्षात कोंबून, दाटीवाटीने बसवून त्यांना प्रवास करायला लावल्याने त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. अशा पद्धतीने रिक्षा चालक, धोकादायक रितीने रिक्षा चालवत असल्याच्या अनेक तक्रारी येऊनही आरटीओ अधिकारी तसेच वाहतूक पोलिसही त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे प्रवासादरम्यान लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नेमकं काय झालं ?

आज (बुधवार) दुपारी 12 वाजताच्या सुमारास डोंबिवली चार रस्ता परिसरात एक रिक्षाचालक शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जात होता. मात्र अचानक त्याचा ताबा सुटला आणि रिक्षा चालकाने एक दुचाकीला धडक दिली. नंतर त्यातील रिक्षा चालक रिक्षेच्या बाहेर फेकला गेला. त्यावेळी मागे तीन शाळकरी विद्यार्थी रिक्षेतच होते. आणि त्यांच्यासह ती रिक्षा पुढे जाऊ लागली. पाहता पाहता ती रिक्षा पुढे जाऊन थेट फुटपाथवर चढली. मात्र तेथे असलेल्या नागरिकांनी सतर्कता दाखवत रिक्षा थांबवली आणि रिक्षेत असलेल्या तिन्ही मुलांना सुखरूप बाहेर काढले.

या मोठ्या अपघातानांतर सर्वच हबकले. पण सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. त्या रिक्षेचं बरंच काही नुकसान झालं आहे मात्र धक्कादायक बाब म्हणजे या रिक्षेत मागे फक्त दोन मुलं होती. मागील सीट वर जागा असतानाही एका विद्यार्थ्याला चालकाच्या बाजूला बसवण्यात आले होते.त्यामुळे हा चालक चार रस्ता परीसरात बऱ्यापैकी वाहनांची वर्दळ असताना आणि सिंगनल परीसर असतानाही वेगात रिक्षा चालवत होता का? असा प्रश्न निर्माण झाला आहे…याबाबत वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकाला वाहतुकीचे नियम तोडले म्हणून 8000 चा दंड ठोठावला आहे. रिक्षा चालकांच्या बेदरकार पद्धतीने रिक्षा चालवणे याबद्दल तक्रारी येऊनही आरटीओ ,वाहतुक पोलिस कानाडोळा करत असल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.