डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कोरोना रुग्णालयात कधी आग लागणे, तर कधी ऑक्सिजनची गळतीसारख्या दुर्दैवी घटना घडत आहेत. नुकतंच डोंबिवलीमधील एका कोव्हिड रुग्णालयात लिफ्ट कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी त्या लिफ्टमध्ये असलेले चार कोरोना रुग्ण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही घटना घडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. (Dombivli private Covid Hospital Elevator collapses Accident)