कोरोना उपचारांनंतर घरी येताच पाटील मालामाल, ठाण्यातील व्यावसायिकाला पाच कोटींची लॉटरी

राजकांत पाटील ठाण्याजवळच्या दिवा भागात आपली पत्नी, आई आणि दोन मुलांसोबत राहतात. डियर लॉटरीच्या तिकीटावर त्यांना पाच कोटींचं बक्षीस मिळालं (Thane Man Dear Lottery COVID)

कोरोना उपचारांनंतर घरी येताच पाटील मालामाल, ठाण्यातील व्यावसायिकाला पाच कोटींची लॉटरी
ठाण्यात दिवा भागात राहणारे राजकांत पाटील पाच कोटींच्या लॉटरीचे मानकरी
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 2:50 PM

ठाणे : कोरोनाच्या संकटकाळात अनेक जण आर्थिकदृष्ट्या खिळखिळे झाले आहेत. अशातच ठाणे जिल्ह्यातील दिवा भागात राहणाऱ्या एका कुटुंबाला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला आहे. राजकांत पाटील या व्यापारी आणि लघु व्यावसायिकाने डियर लॉटरीज बैसाखी बंपर 2021 ड्रॉ जिंकत तब्बल 5 कोटी रुपयांची रक्कम मिळवली आहे. विशेष म्हणजे पाटील नुकतेच कोरोनावरील उपचार घेऊन घरी आले होते. (Thane Man won 5 crore Dear Lottery coming back after COVID treatment)

प्रत्येक व्यक्ती आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असते. त्यासाठी दिवसरात्र मेहनत घेण्याचीही प्रत्येकाची तयारी असते. तरीही ध्येय गाठायला वेळ लागतो. विशेषत: गेल्या वर्षभरापासून अनेकांच्या स्वप्नाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. सगळीकडे नकारत्मकता पसरली आहे. हातात आहे तेही गमावण्याची भीती आहे. त्यातच भविष्याची चिंता असल्यामुळे सर्वांच्याच मनात सतत धाकधूक सुरु आहे. अशा कठीण काळात डियर लॉटरीने पाटील यांच्या विश्वासाला पुन्हा उभारी देत आयुष्यात सकारात्मकता निर्माण केली.

डियर लॉटरीची घरपोच तिकीट विक्री

कोरोना महामारीला सुरुवात झाल्याबरोबर संपूर्ण जग ऑनलाईन शॉपिंगकडे वळले आहे. जीवनावश्यक वस्तूही ग्राहकांना घरपोच मिळू लागल्या. डियर लॉटरीने घोषणा केली की ते आपल्या ग्राहकांना घरपोच लॉटरी तिकिट्स पोहोचवण्याची सेवा देऊन ही नवीन जीवनशैली अंगीकारतील. यामुळे ग्राहकांची संख्या वाढली आणि जबरदस्त कॅश प्राईजेस घरबसल्या, कोणत्याही त्रासाविना सहज जिंकण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध झाली.

कोरोना उपचारानंतर घरी परतल्यावर फोन

राजकांत पाटील ठाण्याजवळच्या दिवा भागात आपली पत्नी, आई आणि दोन मुलांसोबत राहतात. त्यांना जेव्हा लॉटरीविषयी समजलं, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. “मला स्वत:ला कोरोना विषाणूची लागण झाली होती आणि मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो. यातून पूर्णपणे बरा झाल्यावर, जेव्हा मी घरी परतलो तेव्हा मला डियर लॉटरीकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याविषयी एक मेसेज आला. काही कारणास्तव मी जरा गोंधळलो कारण मी कित्येक दिवस आजारी होतो आणि हा मेसेज नेमका कशा संदर्भात आहे ते मला कळत नव्हते. पण अखेर मी त्यांच्याशी संपर्क साधला” असं राजकांत यांनी सांगितलं.

पाच सेकंदात पाच कोटींचे विजेते

‘नमस्कार पाटील साहेब. तुम्ही डियर लॉटरी टीमच्या इतर 25 सदस्यांसह कॉन्फरन्स कॉलवर आहात आणि आम्ही तुमचे अभिनंदन करतो कारण तुम्ही 5 कोटी रुपये जिंकलेले आहात’ असं त्यांनी फोनवर सांगताच काही क्षण मी गांगरलो आणि हे खरंच घडलं आहे याची जाणीव झाल्यावर आनंदाने तोंडातून शब्द फुटत नव्हते” अशी प्रतिक्रिया डियर लॉटरीज बैसाखी बंपर 2021 चे मानकरी ठरलेल्या राजकांत पाटील यांनी दिली.

या लॉटरी तिकिटांची किंमत अवघ्या सहा रुपयांपासून सुरु होते. समाजातील प्रत्येक व्यक्ती यामध्ये सहभागी व्हावा हाच या मागचा हेतू असल्याचे कंपनीने सांगितले आहे. सध्याच्या कठीण काळामध्ये, या महामारीला तोंड देताना, लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, पगार कमी झाले आहेत. अशा स्थितीत नवीन आशा बाळगणे आणि स्वत:ला धीर देणे कठीण होऊन बसले आहे. म्हणूनच डियर लॉटरी आपल्या मजेशीर स्पर्धांच्या माध्यमातून लोकांना नशिबावर विश्वास ठेवण्यास आणि आपलेही भविष्य कधीतरी बदलेल अशी आशा बाळगण्यास प्रोत्साहित करत आहे.

लॉटरीच्या रकमेचं पाटील काय करणार?

“प्रत्येकजण मेहनत घेतो पण प्रत्येकालाच मेहनतीचे फळ मिळतेच असे नाही. कधी कधी, आपल्याला नशिबाला संधी द्यावी लागते.” असे पाटील म्हणाले. व्यवसाय वाढवण्यासाठी आणि अधिक चांगली कामे करण्यासाठी जिंकलेली रक्कम गुंतवण्याचा त्यांचा मानस आहे.

“यातून आम्हालाही खूप आनंद आणि समाधान मिळते. एका वाक्यात सांगायचे झाले तर आम्ही लोकांना त्यांची स्वप्ने आणि इच्छा पूर्ण करण्यास मदत करतो. आम्हाला आशा आहे की अशाच प्रकारे लोकांचे भविष्य आम्ही उज्ज्वल करत राहू.” असे व्यवस्थापकीय संचालक एम अँड सी, जोस चार्ल्स मार्टिन म्हणाले. डियर लॉटरी हे भारताच्या लॉटरी क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आहे. ज्याची उलाढाल 2 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी आहे.

डियर लॉटरीने डीलर्स, स्टॉकिस्ट आणि एजंट्सचे मोठे जाळे, लॉटरी कायदेशीर असणाऱ्या विविध राज्यांत तयार केले आहे. सतत नाविन्यतेचा ध्यास आणि लॉटरीजच्या क्षेत्रातील अविरत संशोधन यामुळे एक भक्कम स्थान डियर लॉटरीने मिळवले आहे. लॉटरी खेळणाऱ्या लाखो लोकांचा डियर लॉटरीवर असलेला विश्वास अद्भुत आहे. 2001 पासून डियर लॉटरी ही जागतिक लॉटरी असोसिएशनची (डब्ल्यूएलए) सदस्य आहे. 2009 मध्ये, डब्ल्यूएलए रिस्पॉन्सिबल गेमिंग फ्रेमवर्कच्या लेव्हल 1 वर पोहोचून पात्रता सिद्ध केल्याबद्दल डब्ल्यूएलएने डियर लॉटरीला मान्यता बहाल केली.

संबंधित बातम्या :

न विकलेल्या तिकिटाने नशीब फळफळलं, लॉटरी विक्रेताच बारा कोटींचा धनी

1800 कोटींची लॉटरी जिंकून एक दमडीही मिळाली नाही, नशीबाने ‘असा’ दिला धोका

(Thane Man won 5 crore Dear Lottery coming back after COVID treatment)

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.