AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका, अजितदादांसमोरच गावकऱ्यांची प्रचंड घोषणाबाजी, मस्साजोगमध्ये नेमकं काय घडलं?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावात जाऊन देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका, अजितदादांसमोरच गावकऱ्यांची प्रचंड घोषणाबाजी, मस्साजोगमध्ये नेमकं काय घडलं?
| Updated on: Dec 21, 2024 | 6:19 PM
Share

काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी आमदारांकडून करण्यात आली. दरम्यान आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. दरम्यान शरद पवार यांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आजच देशमुख कुटुंबाची भेट घेतली आहे.

अजित पवार जेव्हा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी मस्साजोगमध्ये पोहोचले तेव्हा ग्रामस्थ चांगलेच आक्रम झाले. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी जोरदार घोषणाबाजी गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली. धनंजय मुंडे यांनी पक्षपातीपणा केला आहे, त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात आली.

यावेळी बोलताना एका ग्रामस्थानं म्हटलं की, ‘माझं म्हणण असं आहे की आपले मुख्यमंत्री त्यांच्याकडे गृहखातं आहे. चांगलं म्हणून त्यांचं नाव आहे, देशभरात महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाचा दबदबा आहे. मात्र तेरा दिवस झाले तरी यांना तीन आरोपी सापडत नाहीत, याचा अर्थ काय? असा सवाल या ग्रामस्थाने उपस्थित केला आहे. अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की मी तुम्हाला शब्द देतो या प्रकरणातील मास्टर मांइड सुटणार नाही.

दरम्यान अजित पवार यांच्या आधीच आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की या घटनेच्या खोलात गेलं पाहिजे, या घटनेचा सूत्रधार कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या प्रकरणाच्या खोलात जाईपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.