
देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने, थोरा-मोठ्यांचा आशिर्वाद घेऊन अवघ्या 9-10 महिन्यांपूर्वी ज्याच्याशी थाटामाटात लग्न केलं, त्याच्यासोबत रहात असतानाच अवघ्या 28 वर्षांच्या असलेल्या डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. भाजप मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए असलेले अनंत गर्जे यांची पत्नी गौरी गर्जे हिने शनिवारी राहत्या घरात गळफास लावून आयुष्य संपवलं. आधी वैष्णवी हगवणे, मग डॉ. संपदा मुंडे आणि आता डॉ. गौरी गर्जे, या तिघींच्या बळीमुळे अखअख्या महाराष्ट्र सुन्न झाला. लग्नाला वर्षही पूर्म होत नाही, त्याआतच एखादीला जीव द्यावासा वाटला असेल, इततकं टोकाचं पाऊल उचलण्यासारखं तिच्या आयुष्यात काय झालं आणि तेही का झालं, अशा प्रश्नांच्या विविध फैरी सर्वांच्याच मनात आहेत. गौरीच्या आत्महत्येमुळे प्रचंड खळबळ उडाली असून याप्रकरणात काल मध्यरात्री तिचा पती आणि पंकजा मुंडेचा पीए अनंत गर्जे याला अटक केली आहे.
गौरीच्या मृत्यूनंतर तो फरकार होता, पोलिसांनी त्याच्या व कुटुंबियांविरोधात गुन्हाही दाखल केला होता. एकूण तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर काल मध्यरात्री वरळी पोलिसांनी अनंत गर्जे याला बेड्या ठोकत अटक केली. मात्र याप्रकरणातील इतर दोन आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्याबद्दल स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही.
लग्नाच्या वर्षाच्या आतच संपवलं आयुष्य
फेब्रुवारी 2025मध्ये अनंत आणि गौरी या दोघांचा थाटामाटात शाही विवाह झाला. नवीन संसाराला सुरूवात करून काही महिने होण्याच्या आताच गौरीला स्वत:चा अंत करून घ्यावासा वाटला. इतकी टोकाची भूमिका घेऊन तिने आयुष्य सं पवं, यामुळे तिच्या आई-वडिलांना आणि नातेवाईकांना प्रचंड धक्का बसला असून राज्यात मोठी हळहल व्यक्त होत आहे, लग्नांनंतरही अनंत गर्जे याचे विवाहबाह्य, अनैतिक संबंध होते, गौरीला ही गोष्ट समजल्यामुळे त्या दोघांमध्ये प्रचंड वाद व्हायचे. याच वादातून गौरीने आत्महत्या केली असा आरोप केला जात आहे.
तो पुराव सापडल्याने धक्का, वडिलांना WhatsApp पाठवला होता फोटो !
डॉ. गौरी -अनंतच्या नात्यात बराच काळ कुरबूर सुरू होती. अनंतच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल कळल्यावर गौरी हादरली होती. त्यांच्यात अनेक वाद होऊनही अनंतचे वर्तन सुधारलं नव्हतं, त्यातच तिच्या समोर एका कागदाचा पुरावा आला आणि ती कोसळलीच. अखेर तिने टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं. मात्र त्यापूर्वी तिने तिच्या वडिलांना व्हॉट्सॲप वर फोटोच्या माध्यमातून अनंत गर्जेविराोधात पुरावा पाठवला होता. कुटुंबियांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, 30 सप्टेंबर रोजी गौरीने वडिलांना व्हॉट्सॲपवरप काही फोटो पाठवले, ते पाहून आई-वडील हादरलेच. आपल्या लेकींच कायं होईल हा विचार करून आणि तिच्या संसारासाठी त्यांनी काळजी वाटू लागली.
काय होतं त्या फोटोत ?
गौरीने वडिलांना जे फोटो पाठवले, त्यात लातूरमधील एका हॉस्पिटलची काही कागदपत्रं होती. चार वर्षआंपूर्वी म्हणजे 16 नोव्हेंबर 2021मध्ये लातूरच्या ममता हॉस्पिटलमध्ये गर्भवती संमतीपत्र आणि जाहीरनामा असल्याचे त्यात दिसले. किरण असे महिलेचे नाव तर पतीचे नाव म्हणून अनंतगर्जे याचे नाव होते. त्या कागदपत्रावरुन अनंतचे किरण या महिलेशी संबंध असल्याचा संशय वडिलांना आला. त्यानंतर गौरीला फोन करुन त्यांनी या फोटोंबद्दल विचारलं, तेव्हा घराचं शिफ्टींग करताना मला हे कागदसापडले असं गौरीने वडिलांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
त्यानंतर वडिलांनी तिला माघारी येण्यास सांगितलं. पण आपण तिकडे माहेरी आलो, तर अनंत हा आत्महत्या करण्याची धमकी देत असून चिठ्ठी लिहून त्यात आपलं नाव लिहीलं, अशीही धमकी त्याने दिल्याचे गौरीने वडिलांना सांगितलं. एकंदरच हा वाद खूप चिघळलाल होता, त्या दोघांमध्ये सतत वाद सुरूच होते. अनंतच्या घराच्या लोकांनाही त्याच्या अफेअरबद्गल कल्पना होती असे समजते. अखेर याच वादातून गौरीने शनिवारी, 22 नोव्हेंबर रोजी आत्महत्या करत जीवन संपवलं.