AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंगणघाट जळीतकांड : डाईंग डिक्लेरेशन कायदा दोषीला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणार?

भर रस्त्यात युवतीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळणाऱ्या हिंगणघाट जळीत कांडातील आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याची उद्या (20 फेब्रुवारी) न्यायालयीन कोठडी (Dying Declaration act) संपत आहे.

हिंगणघाट जळीतकांड : डाईंग डिक्लेरेशन कायदा दोषीला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणार?
| Edited By: | Updated on: Feb 19, 2020 | 5:05 PM
Share

वर्धा : भर रस्त्यात युवतीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळणाऱ्या हिंगणघाट जळीत कांडातील आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याची उद्या (20 फेब्रुवारी) न्यायालयीन कोठडी (Dying Declaration act) संपत आहे. त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याला थेट न्यायालयात हजर करण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सगद्वारे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे घटनेच्या दिवसापासूनच पीडितेची प्रकृती अत्यवस्थ असल्याने तिचा जवाब नोंदवणे पोलीस प्रशासनाला शक्य झाले नाही. यामुळे या प्रकरणात डाईंग डिकलरेशन कायदा पोलिसांसाठी मदतीचा ठरत आहे. हाच कायदा आरोपीला फाशीपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी पार पाडणार असल्याचे सरकारी वकील बोलत (Dying Declaration act) आहेत.

घटनेनंतर नागरिकांचा संताप पाहता 8 फेब्रुवारीला त्याला मध्यरात्री न्यायालयात हजर करण्यात आले होते.

हिंगणघाट येथील जाळीतकांड प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात घटनेचा संताप पाहायला मिळाला. यामुळे पोलिसांनी खबरदारी आणि सतर्कतेचा दृष्टीने आरोपीला न्यायालयात मध्यत्रीच हजर केले होते. न्यायालयीन कोठडीत असलेल्या या आरोपीला वर्धा कारगृहानेही सुरक्षेच्या दृष्टीने नागपूरला हलवले. उद्या आरोपीला मिळालेली 12 दिवसाची न्यायालयीन कोठडी संपणार आहे. आता या आरोपीला हिंगणघाट येथील सह दिवाणी न्यायाधीश रत्नमाला डफरे यांच्या समक्ष नागपूर कारागृहातून व्हिडीओ कॉन्फेरन्सने हजर केले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

या संपूर्ण प्रकरणात पीडितेचा डाईंग डिक्लेरेशन आरोपी विकेशला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचविण्यासाठी पुरेसा ठरणार आहे. कोणत्याही घटनेत गंभीररीत्या जखमी झालेला व्यक्ती जो मृत्यूशी झुंज देत आहे तो शुद्धीवर आल्यावर त्याचा डाईंग डिक्लेरेशन नोंदवण्यात येतो. गंभीररीत्या जळालेल्या महिला किंवा पुरुषाचा डाईंग डिक्लेरेशन तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांच्या समक्ष नोंदविला जातो. तर काही वेळा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी नोंदवून घेतात. मात्र हिंगणघाट प्रकरणात मृत्युपूर्वी कबुली जवाब न्यायदंडाधिकारी तसेच पोलिसानांही नोंदविता आला नाही. यामुळे पोलिसांनी कायद्याची पुस्तक चाळत पूर्ण अभ्यास केला. यात अंकिताने घटनास्थळावर दिलेला जवाबच आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचवणार असल्याच स्पष्ट झालं आहे.

डाईंग डिक्लेरेशन म्हणजे काय?

डाईंग डिक्लेरेशन कायदानुसार भारतीय पुरावा कायदा 1872 कलम 32(1) मध्ये कोणताही व्यक्ती मरण पावली असेल आणि तिने मुत्यूबाबत कथन केले असेल तर ते ग्राह्य मानले जावे असे नमूद आहे. एवढेच नव्हे तर कायद्यात असाही उल्लेख आहे की मनुष्य मृत्यूच्या दारात असतांना खोटा बोलत नाही. यामुळे जळत असलेल्या पीडितेच्या अंगावर पाणी टाकून तिला दोन तरुणांसह एका महिलेने विझविले होते. त्यावेळेस अंकिताने मला विक्की नगराळेने पेट्रोल टाकून पेटविल्याचे सांगितले होते. हीच कबुली आरेपी विक्कीला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचवणार आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.