AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी, रोहित पवारांच्या निकटवर्तीयाचा 108 कोटींचा घोटाळा? ईडीची धाड, बारामतीसह पुण्यात…

ईडीने बारामती व पुण्यात मोठी छापेमारी केली आहे. विद्यानंद डेअरीशी संबंधित १०८ कोटींच्या फसवणूक प्रकरणी फरार आनंद लोखंडे मुख्य आरोपी आहे. त्याला आमदार रोहित पवार यांचा निकटवर्तीय मानले जाते. लोखंडेवर एकूण ३५० कोटींच्या अपहाराचा आरोप आहे.

मोठी बातमी, रोहित पवारांच्या निकटवर्तीयाचा 108 कोटींचा घोटाळा? ईडीची धाड, बारामतीसह पुण्यात...
ed raid rohit pawar
| Updated on: Dec 10, 2025 | 1:12 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून सातत्याने विविध ठिकाणी छापेमारी केली जात आहे. आज पहाटे ईडीने बारामती आणि पुणे जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई केली आहे. विद्यानंद डेअरीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार आणि गुंतवणूकदारांची तब्बल १०८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे. सध्या फरार असलेला आनंद सतीश लोखंडे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून, तो आमदार रोहित पवार यांचा निकटवर्तीय असल्याचे बोललं जात आहे.

नेमकं कुठे कुठे छापेमारी?

ईडीच्या पथकांनी पुणे जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी आणि बारामती तालुक्यात जळोची, खताळ पट्टा आणि झारगडवाडी यांसह तीन ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम सुरू केली. सध्या फरार असलेला आनंद सतीश लोखंडे आणि त्याची पत्नी विद्या लोखंडे यांच्याशी संबंधित मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आले. हे दोघे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. लोखंडे याच्यावर विविध ठिकाणी मिळून १०८ कोटी रुपयांपेक्षा जास्त अपहार केल्याचे गुन्हे दाखल आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांचे पुतणे विजय सुभाष सावंत यांनी 7 ऑक्टोबर रोजी वाघोली पोलीस ठाण्यात फसवणुकीची मुख्य तक्रार दाखल केली होती.

घोटाळा काय?

यावेळी आरोपींनी बारामती डेअरी प्रायव्हेट लिमिटेड आणि पुणे-मुंबईतील अनेक व्यावसायिकांना दुग्ध व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून 10 कोटींहून अधिक रुपयांना गंडा घातला आहे. याशिवाय, मुंबईतील एका कंपनीकडून 2 कोटी रुपयांचे लोणी आणि सुमारे 93 लाखांचे दूध खरेदी करून त्याचे पैसे थकवल्याचेही समोर आले आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, यात शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवर पतसंस्थांचे कर्ज काढून फसवणूक करणे तसेच मंत्रालयातील काही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचीही गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक केल्याची माहिती मिळत आहे.

या प्रकरणात आरोपी आनंद लोखंडे याचे राजकीय संबंधही तपासले जात आहेत. लोखंडे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता आणि निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. लोखंडे याने रोहित पवारांच्या विधानसभा मतदारसंघात शाळा बांधणे आणि गणवेश वाटणे अशा सामाजिक कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याची माहितीही समोर येत आहे. ईडीच्या या कारवाईमुळे लोखंडे आणि रोहित पवार यांच्यातील संबंधांवर प्रकाश पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या राजकीय कनेक्शनमुळे तपासाची व्याप्ती वाढू शकते, असे बोललं जात आहे.

सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर.
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद.
संदीप देशपांडेंकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड, थेट...
संदीप देशपांडेंकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड, थेट....
भास्कर जाधव विधानसभेत भडकले अन् कामकाजावरच आक्षेप, नेमकं घडलं काय?
भास्कर जाधव विधानसभेत भडकले अन् कामकाजावरच आक्षेप, नेमकं घडलं काय?.
तेव्हा अजित पवारांची सत्ता नव्हती, पण आता तर... दमानियांचा दावा काय?
तेव्हा अजित पवारांची सत्ता नव्हती, पण आता तर... दमानियांचा दावा काय?.
फडणवीस तेव्हा हुडी घालून मला.. शिंदेंनी सांगितला सेनाफुटीवेळीचा किस्सा
फडणवीस तेव्हा हुडी घालून मला.. शिंदेंनी सांगितला सेनाफुटीवेळीचा किस्सा.
कराड जामिनावर सुटल्यास...व्हायरल ऑडिओनंतर जरांगेंचा थेट सरकारलाच इशारा
कराड जामिनावर सुटल्यास...व्हायरल ऑडिओनंतर जरांगेंचा थेट सरकारलाच इशारा.
मातृत्वाला काळीमा... जन्मदात्या आईकडूनच पोटच्या 6 मुलांचा सौदा अन्...
मातृत्वाला काळीमा... जन्मदात्या आईकडूनच पोटच्या 6 मुलांचा सौदा अन्....
नागपूर पारडीत बिबट्याचा थरार, जेरबंद करण्यास असं सुरू रेस्क्यू ऑपरेशन
नागपूर पारडीत बिबट्याचा थरार, जेरबंद करण्यास असं सुरू रेस्क्यू ऑपरेशन.
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल.