IND vs SA : त्यापेक्षा संजू सॅमसनला तुम्ही टीममध्ये घेऊच नका ना, जर तुम्ही…BCCI ला एकदम स्पष्ट पण तितकाच उत्तम सल्ला
IND vs SA : संजू सॅमसनच्या निवडीवरुन नेहमी वाद होत असतात. त्याला स्क्वाडमध्ये स्थान मिळतं. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये बहुतांशवेळा समावेश होत नाही.आता याच मुद्यावरुन बीसीसीआयला एकदम स्पष्ट पण उत्तम सल्ला दिला आहे. त्यामागचं सर्व कॅलक्युलेशनही समजावून सांगितलय.

आशिया कप टुर्नामेंट सप्टेंबर महिन्यात झाली. त्यानंतर सहापैकी चार टी 20 सामन्यत संजू सॅमसनला विश्रांती देण्यात आली. प्लेइंग इलेव्हनमध्ये जितेश शर्माचा समावेश करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. शुबमन गिल आल्यानंतर संजूला मधल्याफळीत ढकललं. नव्या भूमिकेत पाच इनिंग खेळल्यानंतर पुन्हा संजूला टीममधून ड्रॉप करण्यात आलं. स्पेशलिस्ट फिनिशर म्हणून जितेश शर्माचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. तो सुद्धा विकेटकिपिंग करतो. काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कटक येथे जितेश शर्मा टीममध्ये होता. पण संजू सॅमसनला सलग चौथ्या सामन्यात वगळण्यात आलं. टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
कोलकाता नाइट रायडर्सचे टीमचे माजी डायरेक्टर जॉय भट्टाचार्य क्रिकबझशी या मुद्यावर बोलले आहेत. “पुढच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये तुम्ही शुबमन गिलला ओपनर म्हणून निश्चित केलं असेल, तर संजू सॅमसनला टीममध्ये ठेवण्यात काही पॉइंट नाही. मागच्यावर्षी ओपनर म्हणून त्याने तीन शतकं झळकावली. स्वत:ला सिद्ध केलं. मिडल ऑर्डरमध्ये संजूपेक्षा विकेटकीपर फिनिशर म्हणून सिलेक्टर्ससमोर ऋषभ पंत चांगला पर्याय आहे” असं मत जॉय भट्टाचार्य यांनी नोंदवलं.
तर मग किपर तुमचा फिनिशर पाहिजे
“जर तुम्ही संजूला वरती बॅटिंग करण्याची संधी देणार नसाल, तर त्याला टीममध्ये ठेवण्यात पॉइंट नाही. त्याऐवजी तुम्ही ऋषभ पंतला संधी द्या. तो 4,5,6 व्या नंबरवर बॅटिंग करतो. संजूने ओपनर म्हणून तीन शतकं झळकावली आहेत. तुमच्यासाठी त्या पोझिशनवर चांगली कामगिरी केलीय. ओपनर म्हणून तुम्ही शुबमन गिलला निश्चित केलं असेल, तर मग किपर तुमचा फिनिशर असला पाहिजे, जो जितेश आहे” असं जॉय भट्टाचार्य म्हणाले.
यात तीन शतकं
2023 पासून भारतासाठी ओपनिंग करणाऱ्या फलंदाजांमध्ये संजू सॅमसन बेस्ट स्ट्राइक रेटमध्ये (182.89) दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्याआधी फक्त अभिषेक शर्मा (196.55) आहे. संजूने मागच्या दोन वर्षात एकूण 417 धावा केल्या. यात तीन शतकं आहेत. भारत पुढच्यावर्षी होणाऱ्या T20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने संघाची बांधणी करत आहे.
