AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ जमीन खरेदी प्रकरणात आमदार एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्येला दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील महार वतन जमिनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते आमदार एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या शारदा एकनाथराव खडसे यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

'या' जमीन खरेदी प्रकरणात आमदार एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्येला दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर
eknath khadse granted anticipatory bail
| Updated on: May 28, 2026 | 9:16 PM
Share

भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील महार वतन जमिनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या शारदा एकनाथ खडसे यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. भुसावळ न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद आणि कागदपत्रे तपासल्यानंतर हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांना या प्रकरणात मोठा दिलासा मिळाल्याचे म्हटले जात आहे.

जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील महार वतन जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या शारदा खडसे यांच्यावर बोदवड पोलीस ठाण्यात फसवणूक आणि ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

साल २००२ मध्ये तापी-पूर्णा सहकारी साखर कारखान्याची उभारणी करण्याच्या नावाखाली मानपूर येथील चमेलाबाई तायडे आणि त्यांच्या कुटुंबीयांची जमीन खरेदी केली होती. जमीनमालकांना कारखान्यात नोकरी आणि चांगला मोबदला देण्याचे आश्वासन जमीन मालकांना देण्यात आले होते. या जमीनधारकांना उर्वरित रक्कम न देता तसेच प्रत्यक्षात साखर कारखाना देखील न उभारता ही जमीन शारदा खडसे यांच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप एकनाथ खडसे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

राजकीय षडयंत्रातून आरोप – खडसे

दरम्यान, आपल्यावरील आरोप एकनाथ खडसे यांनी फेटाळले आहेत. त्यांनी म्हटले आहे की ही जमीन ‘वर्ग-१’ (Occupant Class-1) प्रकारातील होती, महार वतनाची नाही. तसेच साल २००२ मध्येच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. रेडी रेकनरच्या दराने या प्रकरणात सर्व पैसे अदा झाले होते असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले होते.आपल्या वरील ही कारवाई राजकीय प्रेरित षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला होता. २४ वर्षे जुन्या प्रकरणात सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे पोलिसांना मध्यरात्री हा गुन्हा दाखल करण्यास दबाव आणल्याचाही आरोप त्यांनी केला होता.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला