AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मला आणि माझ्या पत्नीला…’, खडसेंचे पुन्हा महाजनांविरोधात गंभीर आरोप

एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लोबल करत गंभीर आरोप केले आहेत, खडसे यांच्या आरोपांनंतर आता आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

'मला आणि माझ्या पत्नीला...', खडसेंचे पुन्हा महाजनांविरोधात गंभीर आरोप
| Updated on: May 28, 2025 | 7:12 PM
Share

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गिरीश महाजन वारंवार माझ्याबाबत फेकाफेकी करत असतात,  कोट्यवधीची मालमत्ता गिरीश महाजन यांच्याकडे कशी आली?  महाजन हे भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते, एका शिक्षकाचा मुलगा आणि एवढी संपत्ती कुठून आली? असा सवाल यावेळी एकनाथ खडसे यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले खडसे?

एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गिरीश महाजन वारंवार माझ्याबाबत फेकाफेकी करत असतात. मागच्या वेळेसही गिरीश महाजन म्हणत होते की कोथळीची ग्रामपंचायत खडसेंची नाही म्हणून, पण त्यांना सांगायचं आहे की गेल्या 37 वर्षांपासून कोथळीची ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे. मंदाकिनी खडसे या जेलमध्ये जाणार होत्या, पण मी त्यांना वाचवलं असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं. मला जामीन मिळाला तो सुप्रीम कोर्टातून मिळाला, मग महाजन एवढे का फेकत आहेत? असा टोला यावेळी खडसे यांनी महाजन यांना लगावला. मला आणि माझ्या बायकोला जेलमध्ये पाठवण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले, असा आरोपही यावेळी खडसे यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, कोट्यवधीची मालमत्ता गिरीश महाजन यांच्याकडे कुठून आली? महाजन हे भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते, ते एका शिक्षकाचा मुलगा आहेत, मग त्यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली? मी सात वर्षांचा होतो तेव्हापासूनच माझ्या नावावर शंभर एकर जमीन आहे, असंही यावेळी एकनाथ खडसे यांनी म्हटलं.

दरम्यान धरणात जमीन जाणार आहे, या हेतून गिरीश महाजन यांनी जमीन विकत घेऊन 15 कोटी हडप केले. त्यावेळी मंत्री असताना महाजन यांनी पदाचा दुरुपयोग केला, असा आरोपही यावेळी खडसे यांनी केला आहे.

इंदूर- हैदराबाद महामार्ग प्रकल्पामध्ये खडसेंची जमीन जाणार आहे, यावर प्रतिक्रिया देताना खडसेंनी जमीन आताच घेतली, मोबदला मिळावा यासाठी ही जमीन घेतली असा आरोप गिरीश महाजन यांनी केला होता, या आरोपांना उत्तर देताना खडसे बोलत होते.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!