AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॅमेज कंट्रोल करायला मी… एकनाथ शिंदेंचा गजानन कीर्तिकरांना खास कानमंत्र; नेमकं काय म्हणाले?

Eknath Shinde On Gajanan Kirtikar: मी आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी गजानन कीर्तिकरांना एक सल् दिला आहे.

डॅमेज कंट्रोल करायला मी... एकनाथ शिंदेंचा गजानन कीर्तिकरांना खास कानमंत्र; नेमकं काय म्हणाले?
| Updated on: Oct 09, 2026 | 11:37 PM
Share

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी अधिक मैत्री न करण्याचा सल्ला दिला आहे. डॅमेज कंट्रोल करायला मी बसलो आहे इथे. शिवसेना हे एक कुटुंब आहे, असं वक्तव्य शिंदे यांनी केलं. स्थानिक लोकाधिकार समितीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेची स्थापना, मराठी माणसाचा जागतिक स्तरावरील प्रवास, राज्यातील विकासकामे आणि दुष्काळाच्या परिस्थितीवर भाष्य केलं.

एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला ताठ मानेने जगायला शिकवलं. मराठी माणसाला नोकरी आणि व्यवसायाच्या संधी मिळाव्यात, यासाठी स्थानिक लोकाधिकार समितीची स्थापना करण्यात आली. पूर्वी बँका आणि रेल्वेतील भरतीमध्ये मराठी तरुणांना संधी मिळत नव्हती; मात्र आता मराठी माणूस विविध क्षेत्रांत पुढे गेला आहे.

लंडन दौऱ्याचा उल्लेख करताना शिंदे यांनी सांगितलं की, तेथील मराठी बांधवांनी पहाटे त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची माहिती स्थानिक भाषेत मांडली. लंडनमधील महाराष्ट्र मंडळाला दहा कोटी रुपयांची देणगी दिल्याचंही त्यांनी सांगितलं. लवकरच कॅनडाला जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.

राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवर बोलताना शिंदे यांनी शेतकऱ्यांना मदत करताना सरकार हात आखडता घेणार नसल्याचं सांगितलं. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाल्याचा दावाही त्यांनी केला. आगामी काळात चारा, पाणी आणि पाण्याच्या टाक्यांची गरज भासणार असून, दुष्काळाचा सामना करण्यासाठी सर्वांनी मदतीचा हात पुढे करावा, असं आवाहन त्यांनी केलं.

लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं सांगत त्यांनी युवकांसाठी शिक्षण, क्रीडा सुविधा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला. महाराष्ट्रात परदेशी गुंतवणूक वाढत असून, स्थानिक तरुणांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे, असंही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या यशाचा उल्लेख करताना शिंदे यांनी विरोधकांच्या ‘फेक नरेटिव्ह’वर टीका केली. मुख्यमंत्री असतानाही आपण चीफ मिनिस्टर नव्हे, तर कॉमन मॅन म्हणून वावरलो आणि आजही कार्यकर्ता म्हणून काम करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

ते म्हणाले की, मराठी माणसाला ताठ मानेने जगता याव यासाठी शिवसेनेची स्थापना केली. यासाठीच स्थानीय लोकाधिकार समितीची स्थापना झाली. तेव्हा सुधीरभाऊ जोशी अध्यक्ष होते. बँकांची भरती असेल रेल्वेची भरती असेल तिथे आपल्या लोकांना घेत नव्हते. पण आता मराठी माणूस प्रत्येक ठिकाणी पोहोचला आहे. या समितीचा आज वर्धापन दिन आहे. काही विरोधक तरुणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत आहेत. माझा विद्यार्थ्यांना सांगणं आहे की सरकार तुमच्या सोबत आहे. या तरुणांना जे जे मिळाले पाहिजे ते दिले पाहिजे. शिक्षण खेळाचे मैदान सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...