AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगरमध्ये बाळासाहेब देशपांडे दवाखान्यासाठी 5 कोटी आणि नाट्यगृहासाठी 5 कोटी देणार : एकनाथ शिंदे

अहमदनगरमधील बाळासाहेब ठाकरे दवाखान्यासाठी 5 कोटी, तर 1 हजार आसनी नाट्यगृहासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करणार असल्याची घोषणा एकनाश शिंदेंनी केलीय.

नगरमध्ये बाळासाहेब देशपांडे दवाखान्यासाठी 5 कोटी आणि नाट्यगृहासाठी 5 कोटी देणार : एकनाथ शिंदे
| Edited By: | Updated on: Feb 13, 2021 | 10:35 AM
Share

अहमदनगर : अहमदनगरमधील बाळासाहेब देशपांडे दवाखान्यासाठी 5 कोटी, तर 1 हजार आसनी नाट्यगृहासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करणार असल्याची घोषणा राज्याचे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी ही घोषणा केली (Eknath Shinde announce 5 crore each for Hospital and theatre in Ahmednagar).

एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला अहमदनगर महापालिकेअंतर्गत एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) अंमलबजावणी व विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील 10 नगर परिषदा आणि 5 नगर पंचायती अंतर्गत एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) अंमलबजावणी आणि विकास यंत्रणा कामांचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते.

‘प्रलंबित विकास कामे युध्दपातळीवर पू्र्ण करा’

एकनाथ शिंदे म्हणाले, “कोरोनामुळे अडचणी वाढल्या असल्या तरी विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन दिला जाईल. मात्र विकास कामे करताना प्राधान्यक्रम ठरवून कामे करावी लागणार आहेत. अत्यावश्यक कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. मात्र, त्याचवेळी महापालिका, नगरपरिषदांनी स्वतःचा महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रशासन व लोकप्रतिनिधी हे विकासाची दोन रथे आहेत. विकासामध्ये कोणतेही राजकीय अभिनिवेश न बाळगता काम करणे गरजेचे आहे.”

“अहमदनगर शहराजवळील सातशे एकर जमिनीवर फिल्मसिटी, थीम पार्क प्रमाणे मोठा भव्य दिव्य प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. विकासाबाबतची प्रलंबित कामे युध्दपातळीवर पू्र्ण करावीत. अहमदनगर जिल्ह्याच्या विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही,” अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाच्या घोषणा

  • अहमदनगरमधील बाळासाहेब ठाकरे दवाखान्यासाठी 5 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा.
  • अहमदनगरमधील उड्डाणपुलाला अनिलभैया राठोड यांचं नाव देण्याबाबत महासभेने प्रस्ताव मंजूर करुन राज्य सरकारकडे पाठवावा. त्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार.
  • छत्रपती संभाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा उभारण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश.
  • एक हजार आसनी नाट्यगृहासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करत असल्याची घोषणा.
  • अहमदनगर जिल्ह्यातील विविध नगरसेवक, नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधी, आमदार यांनी विकासकामांबाबत मांडलेल्या सूचनांवर सकारात्मक निर्णय घेणार.
  • संभाजीनगर नाव करण्याबाबत लोकांची मागणी असून आम्ही लोकांसोबत, अहमदनगरचे नाव बदलण्याबाबत जनतेची मागणी असेल तर त्यासोबत, अनधिकृत बांधकामं खपवून घेणार नाही, पाणी पुरवठा व भूमिगत गटार योजना प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील याकडे लक्ष देण्याचे निर्देश.

हेही वाचा :

पत्रीपुलाला अब्दुल कलाम यांचं नाव द्या; आजपासून वाहतुकीसाठी पूल सुरु

एकनाथ शिंदेंच्या रणनितीचा फायदा, चंद्रपूर, गोंदिया, भंडाऱ्यात शिवसेनेची जोरदार मुसंडी

आधी राज ठाकरेंच्या शब्दाखातर आंदोलन सोडलं, नदीच्या स्वच्छतेसाठी कल्याणकराचं पुन्हा आंदोलनाचं हत्यार

व्हिडीओ पाहा :

Eknath Shinde announce 5 crore each for Hospital and theatre in Ahmednagar

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.