AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळी आधीच मदत देऊ, एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा साजरा झाला. यावेळी त्यांनी पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी घोषणा केली.

पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळी आधीच मदत देऊ, एकनाथ शिंदे यांची घोषणा
eknath shinde
| Updated on: Oct 02, 2025 | 8:43 PM
Share

मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा साजरा झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीपूर्वी त्यांना मदत मिळेल, हा एकनाथ शिंदे यांचा शब्द आहे अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. यंदाच्या पुरग्रस्तांच्या संकटामुळे हा मेळावा मुंबई आणि ठाण्यापुरताच आयोजित केला होता. आज बाळासाहेब असते त्यांनी आम्हाला आशीवार्द दिला असता असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

एकनाथ शिंदे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की शिवसेनेचा दसरा मेळावा नेहमी थाटामाटात साजरा होत असतो, यंदा बळी राजा संकटात असल्याने आणि मराठवाड्यात आपत्ती आली आहे. पूरस्थिती निर्माण झाली आहे त्या बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी मीच शिवसैनिकांना सांगितले की तुम्ही तेथेच थांबा पूरग्रस्तांना मदत करायला. तसेच मुंबई आणि ठाण्यापुरता हा दसरा मेळावा मर्यादीत केला असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

बळीराज्याच्या डोळ्यात अश्रू आहे. शेतीवाहून गेली आहे. घरे पडली आहेत. त्यांचे दु:ख डोळ्याने मी स्वत: पाहीले आहे. कारण बाळासाहेबांनी आम्हाला सांगितले की ८० समाजकारण आणि २० टक्के राजकारण करायचे. हा मंत्र आपण सोडला नाही. जेथे संकट तेथे शिवसेना,जिथे संकट तेथे हा एकनाथ शिंदे धावून जातो असेही शिंदे यावेळी म्हणाले.

मदतीचे तोरण हेच शिवसेनेचे धोरण आहे. महापुराने बळीराजा कोलमडला आहे. अटी आणि शर्थी बाजूला ठेवून बळीराजाला मदतीचा आधार दिला पाहीजे. संकट मोठे आहे. अनेक वर्षात एवढा पाऊस आम्ही पाहिला नाही असे शेतकरी म्हणत आहेत. सगळं काही उद्धवस्त झाले आहे. म्हणून या मेळाव्याला आपण आजूबाजूच्या लोकांना बोलवले. दसरा सण मोठा, नाहीआनंदाला तोटा. परंतू यावेळी पुराचे संकट आहे. आपण त्यासाठी हा निर्णय बळीराजासाठी घेतला आज बाळासाहेब असते तर आपली पाठ थोपटली असती.आता मदतीचा हात द्यायचा नाही तर कधी द्यायचा..पूर्वी देखील जेव्हा दुष्काळ आला, पूर आला तेव्हा शेतकऱ्यांना अन्नधान्य पाणी, चारा देण्याचे काम शिवसैनिकांनी केले आहे.

 कपड्यांची इस्री सांभाळणारा आणि व्हॅनिटी व्हॅन घेऊन…

एकनाथ शिंदे म्हणाले की त्यामुळे तुम्ही धीर सोडू नका,टोकाचे पाऊल टाकू नका. तुमचे भाऊ इकडे आहेत. शेतकऱ्याचा मुलगा असल्याने शेतकऱ्यांची वेदना आहे.पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. तुम्हाला मदत दिवाळी येण्यापूर्वी दिली जाईल हा तुमच्या एकनाथचा शब्द आहे. इरसाल वाडी असो की कश्मीरमध्ये पहलगाम झाले तेव्हा आपण त्यांना सुखरुपण आणण्याचे काम केले. कपड्यांची इस्री सांभाळणारा आणि व्हॅनिटी व्हॅन घेऊन जाणारा एकनाथ शिंदे नाही. वर्क फ्रॉम करणारा शिवसैनिक नाही. बाळासाहेब म्हणायचे की संकटात शिवसैनिक घरात दिसता कामा नये. लोकांच्या दारात दिसला पाहिजे असेही शिंदे यावेळी म्हणाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...