AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार; बड्या नेत्याचं वक्तव्य

राज्याच्या राजकारणात पुन्हा फोडाफोडी होणार असल्याचे संकेत खासदार नरेश म्हस्के यांनी दिले. नरेश म्हस्के यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार; बड्या नेत्याचं वक्तव्य
eknath shinde news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 05, 2026 | 12:34 PM
Share

राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचं राजकारण सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने भुसावळमधील शरद पवार गटाचे 11 नगरसेवक फोडले. तर मुंबईत महापौरपदासाठी देखील एकनाथ शिंदे यांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. आता ठाकरेंचे आमदार देखील फुटणार असल्याची चर्चा केली जात आहे. राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू असताना येत्या दिवसांत ठाकरे गटात कोणीच शिल्लक राहणार नाही. येत्या काही दिवसांत सर्व कळेल, असा दावा एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे नेते, खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. खासदार म्हस्के यांच्या दाव्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

नरेश म्हस्के यांनी ठाण्यातील दहीहंडींना भेटी देत आहेत. संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीला हजर राहिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मोठा दावा केला. राजकीय हंडीविषयी म्हस्के म्हणाले, ‘राजकीय हंडी ही एकनाथ शिंदेंनी फार पूर्वी फोडली. त्यांनी दाखवून दिलं की, ठाण्याचा एकनाथ शिंदे हंडी फोडू शकतो. आता आगामी फोडाफोडी कळेल. काही दिवसांतच कळेल. कोणीच शिल्लक राहणार नाही. ठराविक दोन-व्यक्ती सोडल्यावर, कोणीच शिल्लक राहणार नाही’.

नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत यांनी तुरुंगात विष प्रयोग झाल्याचा संशय व्यक्त केला. त्यावरून म्हस्के म्हणाले, संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठे होण्याचा प्रयत्न करत आहेत. सतत प्रसिद्धीत राहण्यासाठी अशी वक्तव्ये करत असतात. ते उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर चढून हंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रसिद्धी माध्यमात राहण्यासाठी अशी वक्तव्ये करत आहेत. मानसिक रुग्णाची शेवटची स्टेज आहे. त्यामुळे अशी वक्तव्ये करत आहे’.

‘राहुल गांधींच्या जवळ असल्याचे भासवत आहेत. राहुल गांधी राज्यसभेची संधी देतील. कारण इकडे काही नाही. सातत्याने राहुल गांधींचा जप करतात. कारण त्यांना संधी हवी असेल, तर त्यांना राहुल गांधी हा एकमेव पर्याय आहे. त्यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले. ठाण्यातील दहीहंडीवर म्हस्के म्हणाले, ‘रामनगरच्या पथकाने 9 थर लावले आहेत. ठाणेकरांनी हा विक्रम केला आहे. संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीचं आयोजन हे रविंद्र पाठक यांच्या नेतृत्वात करण्यात आलं आहे. दहीहंडीची पंढरी ठाण्याला म्हटलं जातं. संपूर्ण ठाण्याचं वातावरण दहीहंडीमय झालं आहे’.

Follow Us
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत; मुख्य सूत्रधारावर तब्बल...
तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
Babanrao Taywade | ओबीसींच्या हक्कांवर गदा आली तर रस्त्यावर उतरू! बबनराव तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर राऊतांचा संताप
Sanjay Raut | सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा संताप; बापटांच्या भूमिकेला पाठिंबा
दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा...
Dahi Handi in Mumbai | दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा पथकाने उत्सवातून समाजाला दिला मोठा संदेश
मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला
Dahi Handi 2026 | मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला; महिला गोविंदांचाही दमदार सहभाग
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस! स्कूल व्हॅनमध्ये...
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
Mumbai DJ Ban | मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन भारतींची मोठी घोषणा
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच