एकनाथ शिंदेही पवारांसारखं म्हणाले, प्रकरणं संवेदनशील आहे !

सध्या राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्येत शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्याने चर्चेला उधाण आलंय.

एकनाथ शिंदेही पवारांसारखं म्हणाले, प्रकरणं संवेदनशील आहे !

औरंगाबाद : सध्या राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्येत शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्याने चर्चेला उधाण आलंय. भाजप नेत्यांनी थेट संजय राठोड यांचं नाव घेत लक्ष्य केल्यानं शिवसेनेची चांगलीच कोंडी झालीय. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी या विषयावर बोलणंच टाळलंय. त्यात शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याप्रमाणेच सावध प्रतिक्रिया दिली. हे प्रकरण संवेदनशील आहे, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी यावर फार बोलणं टाळलं (Eknath Shinde comment on Pooja Chavan suicide case and Sanjay Rathod).

एकनाथ शिंदे म्हणाले, “पूजा चव्हाण प्रकरण संवेदनशील आहे. या विषयात मला जास्त माहिती नाही. माहिती घेऊनच या विषयावर बोलेन. सध्या बोलणं उचित नाही.”

थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणे योग्य नाही: एकनाथ शिंदे

“झालेली घटना दुर्दैवी आहे, मात्र थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणे योग्य नाही, या प्रकरणी माहिती घेतल्यानंतर बोलणे उचित राहील, थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव घेणं योग्य नाही,” असंही एकनाथ शिंदे म्हणालेत. औरंगाबादेत टीव्ही 9 मराठीकडे एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

टिक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात चांगलंच चर्चेत आलंय. विदर्भातील शिवसेनेचे मोठे नेते आणि वन मंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणात समोर आल्यापासून भाजप चांगलीच आक्रमक झालीय, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं शिवसेनेवर दबाव टाकण्यास सुरुवात केलीय. विशेष म्हणजे नेहमीच शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यात पुढे असलेले संजय राऊत यांनी या प्रकरणी बोलण्यास नकार दिलाय. तर नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनीही या प्रकरणी सावध प्रतिक्रिया दिलीय.

थेट कॅमेऱ्यासमोर बोलण्यास संजय राऊतांचा नकार

शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य केलं. पण संजय राऊत यांनी थेट कॅमेऱ्यासमोर न बोलता ऑफ दी रेकॉर्ड प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्रीच या प्रकरणी बोलतील असं राऊत यांनी म्हटलं. शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रसारमाध्यमांनी गाठून पूजा चव्हाण प्रकरणी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण राऊत यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच या प्रकरणावर प्रतिक्रिया देतील, असं त्यांनी ऑफ द रेकॉर्ड सांगून या प्रकरणावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. त्यानंतर राऊत हे नाशिकच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे मुख्यमंत्री या प्रकरणावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

अरुण, पूजा आणि कथित मंत्र्याचा संवाद, 11 क्लिप कुणाची कारकीर्द संपवणार?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, यवतमाळ रुग्णालयातून नवी माहिती उघड

बंजारा नेते संजय राठोडांच्या पाठिशी; षडयंत्र रचणाऱ्यांना दिला ‘हा’ इशारा

व्हिडीओ पाहा :

Eknath Shinde comment on Pooja Chavan suicide case and Sanjay Rathod

Published On - 6:22 pm, Sat, 13 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI