AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, बडा नेता नाराज, उद्धव ठाकरेंना पुन्हा साथ देणार?

शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. वरिष्ठ नेते गजानन कीर्तिकर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गजानन कीर्तिकर हे उद्धव ठाकरे गटात पुन्हा प्रवेशाची शक्यता आहे.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, बडा नेता नाराज, उद्धव ठाकरेंना पुन्हा साथ देणार?
gajanan kirtikarImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 09, 2026 | 3:05 PM
Share

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी हाती आली आहे. देशासहित राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त करत शिंदे गटाची वाट धरली होती. परंतु आता वारं फिरू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा बडा नेता पुन्हा ठाकरे गटात परतणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार गजानन कीर्तिकर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या दिवसांत शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार गजानन कीर्तिकर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांचे वडील गजानन कीर्तिकर हे उद्धव ठाकरे गटात पुन्हा प्रवेश करण्याची  शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू झाल्यानंतर गजानन कीर्तिकर यांनीही यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गजानन कीर्तिकर यांनी टीव्ही9 मराठी बोलताना शिंदे गटावर नाराजी असल्याचं स्पष्ट केलं. पक्षाच्या प्रमुखाशी संपर्क होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

गजानन कीर्तिकर म्हणाले, ‘मी घरवापसी करणार नाही. मी दल बदलू नाही. मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाठीमागे उभा आहे. पण मी नाराज आहे. कारण आमचे जे पक्षप्रमुख आहेत, त्यांच्याशी संपर्क होत नाही. त्यांची भेट होत नाही. काही जनहिताच्या काम असतात. आम्ही शिवसेनेचा नेता असल्यामुळे अन्यायग्रस्त लोक येतात, सरकारकडून न्याय मिळावा म्हणून लोक येतात. त्यांच्यासाठी आम्हाला संपर्काची गरज असते, तसेच भेटीची गरज असते, परंतु भेट होत नाही म्हणून मी नाराज आहे. मला पद वगैरे काही नको. जसा प्रतिसाद मिळाला पाहिजे, तसा पक्षाकडून मिळत नसल्याने मी नाराज आहे. उद्धव ठाकरे जेव्हा पक्षप्रमुख होते आणि नाराजी होती, जवळजवळ तसंच चाललं आहे’ गजानन किर्तीकर यांनी नाराजी व्यक्त केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. आता यावर एकनाथ शिंदे हे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.

Follow Us
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....