AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सगळा गेम क्षणात फिरला, ठाकरेंचे 6 बंडखोर खासदार दिल्लीतून गायब? एकनाथ शिंदे ठाण्यात येताच मोठी घडामोड!

आता एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. ते ठाण्यात येण्यामागे एक विशेष कारण असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष हा ठाकरे गटाकडून येणाऱ्या आक्षेपांवर काम करणार आहे.

सगळा गेम क्षणात फिरला, ठाकरेंचे 6 बंडखोर खासदार दिल्लीतून गायब? एकनाथ शिंदे ठाण्यात येताच मोठी घडामोड!
eknath shinde and uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 18, 2026 | 2:24 PM
Share

Eknath Shinde Operation Tiger : उद्धव ठाकरे यांच्या एकूण सहा खासदांनी बंड केल्याचे बोलले जात आहे. ही बंडखोरी रोखण्यासाठी ठाकरे गटाकडून हरतऱ्हेने प्रयत्न केले जात आहेत. ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत हे दिल्लीमध्येच आहेत. ते बंडखोर खासदारांशी सातत्याने संपर्क करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सहा खासदारांपैकी दोन खासदार परत येण्याची ठाकरे गटाला आशा आहे. असे असतानाच आता सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री दिल्लीहून ठाण्यात परतले आहेत. ते ठाण्यात येत आल्यानंतर आता बंडखोर खासदार दिल्लीतून गायब झाले आहेत.

नेमकं काय घडतंय?

मिळालेल्या माहितीनुसार आता एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. ते ठाण्यात येण्यामागे एक विशेष कारण असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष हा ठाकरे गटाकडून येणाऱ्या आक्षेपांवर काम करणार आहे. बंडखोर खासदारांचा प्रवेश झाल्यावर भविष्यात कोणताही कायदेशीर पेच निर्माण होणार नाही, यासाठी अगोदर शिंदे गटाकडून काम केले जाणार आहे. त्यासाठी सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाजू तपासल्या जाणार आहेत. त्यानंतर शिवसेना पक्षाकडून या सहा खासदारांच्या पक्ष प्रवेशाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

सध्या खासदारांचा पक्षप्रवेश लांबणीवर

सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून ठाकरे यांच्या खासदारांच्या प्रवेशावर कायदेशीर अभ्यास केला जाईल. त्यामुळेच तुर्तास या सहा खासदारांचा प्रवेश दोन ते तीन दिवस लाबंणीवर टाकण्यात आला आहे. त्याआधी एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत ऑपरेशन टायगर यशस्वीपणे राबवलं आहे. त्यात त्यांना यश आल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे.

खासदार दिल्लीतून गायब

आता पुढचे दोन ते तीन दिवस हे महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व 6 खासदारांना सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतून बाहेर हलवण्यात आले आहे. तशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आता हे बंडखोर सहा खासदार नेमके कुठे आहेत, ते अद्याप समोर आलेले नाही.

पुढील दोन दिवस काहीही समोर आणले जाणार नाही

सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गटाकडून आता लगेच काहीही जाहीर केले जाणार नाही. कोणतेही पुरावे दिले जाणार नाहीत.  शिवसेनेकडून वेट एंड वाॅचची भूमिका घेण्यात आली आहे. ठाकरे गटाचे कायदेशीर डावपेच बघूनच पुढील पाऊले टाकली जाणार आहेत. पुढील २ दिवस तरी अधिकृतरित्या काहीही समोर आणले जाणार नाही, असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं