AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena vs BJP : देशात परिस्थिती बदलताच एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याचं महायुतीला तडा जाईल असं वक्तव्य

Shivsena vs BJP : एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याने महायुतीला घरचा आहेर दिला आहे. देशात परिस्थिती चांगली वाटत नाही असं म्हटलं आहे. सध्या पुण्याच्या निवडणुकीवरुन शिवसेना-भाजपमधील संबंध ताणले गेले आहेत.

Shivsena vs BJP : देशात परिस्थिती बदलताच एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याचं महायुतीला तडा जाईल असं वक्तव्य
Mahayuti
| Updated on: Oct 14, 2026 | 10:03 AM
Share

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन शिवसेना-भाजपमधील मतभेद तीव्र झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पुण्यात वेगळ्या वाटेने जाण्याचे संकेत दिले आहेत. एकप्रकारे दबावाच्या राजकारणाचा हा भाग आहे. पुण्यात शिंदे सेनेने आधी अधिकृतपणे मंगेश चिवटे यांना एबी फॉर्म दिला होता. नंतर त्याला माघार घ्यायला लावली. त्यावेळी असं वाटेलंल की, शिवसेने पुण्यात भाजपं उमेदवाराचं समर्थन करेल. पण काल रात्री नंदनवन या शिंदेंच्या शासकीय निवासस्थानी शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. त्यात अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा देण्यावर चर्चा झाली. आता या सगळ्या विषयावर पुण्यात शिंदे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर बोलले आहेत. त्यांनी यावेळी देशात परिस्थिती चांगली वाटत नाही असं बोलून महायुतीला घरचा आहेर दिला.

मंगेश चिवटे यांना आधी उमेदवारीचा फॉर्म दिला नंतर माघार घेतली यावर रवींद्र धंगेकर म्हणाले की, “राजकारणात काही आराखडे असतात. काही वर-खाली दिसत असतं. पक्षाने त्यांचा निर्णय घेतला. आज अंतिम निर्णय होईल. उद्या नाही” “सचिन सानप यांना पाठिंबा देण्याबद्दल अजून काही अंतिम निर्णय झालेला नाही. मी पक्षाचा प्रमुख नाही. शिंदे साहेब निर्णय घेतील. साधक-बाधक चर्चा झाली आहे” असं रवींद्र धंगेकर म्हणाले.

जे काय असेल ते खुल्लम खुल्ला होईल

“ग्राऊंडवर, लोकांमध्ये काय चर्चा आहे त्यावर चर्चा झाली. देशात परिस्थिती चांगली वाटत नाही. देशामधलं चित्र बदलत चाललं आहे. कचऱ्याचं टेंडर, पाण्याचं टेंडर यावर चर्चा होते. जनतेची कामं सोडून टेंडरची काम चालू आहेत. त्यामुळे 100 नगरसेवकांचा स्वाभिमान दुखावला असेल” असं धंगेकर म्हणाले. “सचिन सानप यांना पाठिंबा देण्याची घोषणा झालेली नाही. कालची आढावा बैठक होती. आमदार, खासदार, नगरसेवक यांची चर्चा झाली. कशापद्धतीने ही निवडणूक लढवली पाहिजे. यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. आज अंतिम निर्णय होईल. शिंदेसाहेब छुपा वैगेर पाठिंबा देत नाहीत. जे काय असेल ते खुल्लम खुल्ला होईल, ओपन होईल. होय किंवा नाही” असं धंगेकर बोलले.

Follow Us
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे