पार्थ पवार तक्रार करण्याएवढा मोठा नेता नाही, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्र्याचं वक्तव्य
मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे पासून आमरण उपोषणाची हाक दिली आहे. आरक्षणासाठी नवीन समिती स्थापन करा अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे. त्यांच्या पुढच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट बोलले आहेत.

“अजित दादा यांच्या राष्ट्रवादीत जो काही वाद सुरू आहे. तो विषय शरद पवार यांच्याकडे गेला. ते वाद सोडवतील असे वाटत आहे, पण असं नाही. पक्ष विलीन होणार अशा चर्चा होत्या, आता त्याला पूर्णविराम मिळाला. पण आता पक्ष फुटीच्या मार्गावर असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे तटकरे यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी शरद पवार यांच्याशी चर्चा झाली असावी” असं संजय शिरसाट म्हणाले. राज्य सरकारमध्ये ते सामाजिक न्याय मंत्री आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ते नेते आहेत. “पार्थ पवार तक्रार करायला एवढा मोठा नेता नाही. सुनेत्रा पवार ठीक आहे. त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय आहे. त्यांनी काय निर्णय घायचा त्यांचा अधिकार आहे” असं संजय शिरसाट म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका बड्याने त्याने पार्थ पवार यांची शरद पवार यांच्याकडे तक्रार केली अशी चर्चा आहे. त्यावर संजय शिरसाट बोलत होते.
“ज्यांना पक्षात काम करण्यापासून रोखले जातं. ते वेगळा मार्ग शोधत असतात. अनेक लोक या पक्षातून त्या पक्षात जाण्यास सुरुवात झाली आहे” असं संजय शिरसाट यांनी सांगितलं. “शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. यावर पर्याय काढला पाहिजे. कांद्याला भाव दिला आहे. पण यातून प्रश्न सुटला असे म्हणता येणार नाही, शेतकऱ्यांनी देखील संयम ठेवला पाहिजे. सरकारमध्ये देखील शेतकरी मुलं बसली आहेत” असं शिरसाट म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांचा इशारा सरकारने गांभीर्याने घेतला
“मनोज जरांगे पाटील यांनी तीन महिन्यांपूर्वी इशारा दिला होता. सरकारने गांभीर्याने घेतला होता. विखे-पाटील भेटले देखील होते. सरकारने यावर सकारात्मक पाऊल उचलले. त्यांच्या मागण्या किती तडीस नेता येईल यासाठी प्रयत्न असेल. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण देण्याची भूमिका आधीपासूनच आहे” असं संजय शिरसाट म्हणाले. ‘जरांगे यांची प्रमाणपत्राची मागणी आहे, त्याला गती देण्यासाठी स्थापन केलेली समिती काम करेल’ आरक्षणासाठी नेमलेली समिती काम करत नाही असं मनोज जरांगे पाटील यांचा आरोप आहे.