एकनाथ शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवाला बाबा, कुंभमेळ्यात नागा साधूंबरोबर बसा ना; संजय राऊत यांची खोचक टीका

पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाराजीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. शिंदे यांच्या पक्षातील मंत्र्यांना पद मिळाले नाही यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर शिंदे यांच्यावर टीका केली आहे आणि त्यांना कुंभमेळ्यात जाण्याचा सल्ला दिला आहे.

एकनाथ शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवाला बाबा, कुंभमेळ्यात नागा साधूंबरोबर बसा ना; संजय राऊत यांची खोचक टीका
संजय राऊतांची एकनाथ शिंदेवर खोचक टीका
Follow us
| Updated on: Jan 20, 2025 | 10:38 AM

राज्यातील आमदारांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पालक मंत्री पदाचे वाटप नुकतेच पूर्ण झाले. मात्र पालकमंत्रीपदावरून पुन्हा एकदा महायुतीत धुसफूस सुरू झाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज झाल्याचे वृत्त आहे. एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी दरे येथे गेले आहेत. शनिवारी पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाली, मात्र या यादीमध्ये मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांना स्थान मिळू शकलेलं नाही. दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद मिळावं अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा होती, मात्र गोगावले आणि भुसे यांना पालकमंत्रिपद न मिळाल्यानं शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यामुळे ते पुन्हा दरे गावी गेले आहेत, अशी चर्चाही आहे. आता याच मुद्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासादर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवर टीका करत त्यांना टोला लगावला आहे. ” आमचे एक डेप्युटी सीएम आहेत ठाण्याचे त्यांना राग येतो आणि ते गावाला जाऊन बसतात. पहाटे जातात, दुपारी जातात, दिवसा जातात. त्यांच्या गावात जाऊन बसतात. सरकार कुणी चालवायचं मग?” असा सवाल राऊतांनी विचारला.

एकनाथ शिंदे अस्वस्थ आत्मा

” एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहे. त्याने खरं म्हणजे महाकुंभमेळ्यात जाऊन बसायला पाहिजे होतं नागा साधूंबरोबर. नागा साधूही अस्वस्थ असतो फार. अघोरी विद्या करतात, नाचतात आपल्या तंबूत बसतात. जे अस्वस्थ आहेत महाराष्ट्रात आहेत या क्षणी, त्यांच्यासाठी योगी आदित्यराज जींनी प्रयागराजमध्ये काही तंबू आणि साधूंची व्यवस्था केली आहे. अस्वस्थ आत्म्यांनी तिकडे जायचं. अस्वस्थ आहात तर महाराष्ट्राला का त्रास देता. तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका. तुमची ही राजकीय अस्वस्थता महाराष्ट्राच्या मुळावर , लोकांच्या मुळावर येतेय. जितके दिवस कुंभ आहे, तितके दिवस अस्वस्थ मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी कुंभमेळ्यात जाऊन शांतपणे ध्यानधारणा करावी” असा खोचक सल्ला ही राऊत यांनी एकनाथ शिंदेंना दिला.

नाराजीचं कारण कळलं पाहिजे

नाराजीचं कारण राज्याला कळलं पाहिजे. लहान मूल रुसावं आणि कोपऱ्यात जाऊन बसावं, तर नाराजीचं कारण नक्की काय आहे. पद, पैसा, प्रतिष्ठा, खंडणी… नेमकं काय आहे ते कळलं पाहिजे आम्हाला, असं राऊत म्हणाले.

स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी.
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता....
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय.
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली.
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?.
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला.
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार.
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही.
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले...
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले....
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी.