AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…ते पद माझ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपेक्षा मोठं’, नाराजीच्या चर्चेवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे, यावर बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

'...ते पद माझ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपेक्षा मोठं', नाराजीच्या चर्चेवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
| Updated on: Feb 03, 2025 | 11:24 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्यची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या कॅबिनेटच्या बैठकीला देखील ते उपस्थित नव्हते, तसेच त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत आणखी एक बैठक बोलावली होती, या बैठकीला देखील शिंदे यांनी दांडी मारली. त्यानंतर एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाल. यावर आता एकनाथ शिंदे यांनी मोठा खुलासा केला आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे? 

रखडलेले प्रकल्प आणि विकासाचे प्रकल्प यांना आपण चालना दिली, लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण सुरू केल्या. लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, लाडका भाऊ, लाडके शेतकरी, ज्येष्ठ लोकांसाठी देखील योजना आपण आणल्या, एसटीमध्ये महिलांना 50 टक्के सवलत आपण दिली. लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली. विधानसभा निवडणुकीत महिलांनी मोठा विजय मिळवून दिला. विरोधकांचं डिपॉझिट जप्त केलं. त्यामुळे आता सरकारची जबाबदारी आणखी वाढली आहे. विरोधक कितीही काय बोलले तरी लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही .जे आम्ही बोलतो ते करतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे, यावर देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. मी समाधानी आहे .पद येतात आणि जातात पद वर खाली होतात. यावेळेस या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून माझी ओळख निर्माण झाली.  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदापेक्षा माझ्यासाठी हे सर्वात मोठ पद आहे, असे मी मानतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या लाडक्या भावाकडे हाउसिंग आणि नगर विकास मंत्रालय आहे. प्रकल्प कोणी थांबू शकत नाही. मी जे बोलतो ते करतो, महाराष्ट्रातील सर्व रखडलेले प्रकल्प मला मार्गी लावायचे आहेत, असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?