AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणाकडे इनोव्हा, तर कुणाकडे मर्सिडिज… अंबादास दानवे, झिशान सिद्दिकी, नीलम गोऱ्हेंच्या संपत्तीत मोठी वाढ, एकाची संपत्ती तर पाचपट…

विधान परिषदेच्या उमेदवारांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. नीलम गोऱ्हे , अंबादास दानवे यांच्या कुटुंबाची संपत्तीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राष्ट्रवादीचे झिशान सिद्दीकी यांची संपत्ती अवघ्या दोन वर्षांत चौपट झाल्याचे स्पष्ट झाले.

कुणाकडे इनोव्हा, तर कुणाकडे मर्सिडिज… अंबादास दानवे, झिशान सिद्दिकी, नीलम गोऱ्हेंच्या संपत्तीत मोठी वाढ, एकाची संपत्ती तर पाचपट…
| Edited By: | Updated on: May 02, 2026 | 8:38 AM
Share

राज्यभरात सध्या विधान परिषद निवडणुकीचं वार वाहत असून सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नाव जाहीर केली. 30 एप्रिल हा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. 12 मे रोजी निवडणूक होणार असून त्याच मतदानाच्या दिवशीच संध्याकाळी मतमोजणी होणार आहे. विधान परिषदेसाठी 9 जागांचा कोटा असून 5 जागा भाजप, शिवसेना शिंदे गटाकडून 2, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 1 आणि शिवसेना ठाकरे गटाकडून एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून अतिरिक्त उमेदवार देण्याची शक्यता होती, मात्र भाजपानं अतिरिक्त उमेदवार न दिल्यानं आता या निवडणुकीसाठी 9 चं उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

या निवडणुकीत ठाकरे गटाकडून अंबादास दानवे, तर शिवसेना शिंदे गटाकडून नीलम गोऱ्हे, बच्चू कडू आणि राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकीला उमेदावरी देण्यात आली आहे. दरम्यान या उमेदवारांबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

संपत्तीत झाली वाढ

शिवसेनेकडून पुन्हा उमेदवारी मिळालेल्या नीलम गोहे आणि ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार अंबादास दानवे यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दीकी यांची संपत्ती अवघ्या दोन वर्षांत तब्बल चारपट वाढल्याचे दिसून आले आहे.

विधान परिषदेच्या विद्यमान उपसभापती नीलम गोहे यांच्या संपत्तीत गेल्या सहा वर्षांत दहापट वाढ झाल्याचे समोर आले आहे. नीलम गोऱ्हे यांच्याकडे 2020 साली 1.57 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता होती तर स्थावर मालमत्तेचे मूल्य सहा कोटी रुपयांच्या घरात होते. तर आता (2026 साली) नीलम गोऱ्हे यांची जंगम मालमत्ता 11.66 कोटी रुपये झाली आहे. त्यांनी स्थावर मालमत्तेत 7.69 कोटी रुपयांची स्वअर्जित तर 12.76 कोटी रुपयांची वडिलोपार्जित मालमत्ता जाहीर केली आहे. गोन्हे यांच्याकडे टोयोटा इनोव्हा हायक्रॉस ही 34.69 लाख किंमतीची गाडीही आहे.

कुणाकडे इनोव्हा, तर कुणाकडे मर्सिडिज…

तर शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना पुन्हा उमेदवारी दिली असून त्यांच्या संपत्तीतही भरघोस वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 2019 सालीखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार दानवे यांची कुटुंबाची मिळून 63.78 लाख रुपयांची जंगम संपत्ती होती. तर, 46.24 लाख रुपये किंमतीची स्थावर मालमत्ता होती. पत्नी अनुराधा यांच्या नावे 13.94 लाख रुपयांचे कर्ज होते.

मात्र आता पुन्हा उमेदवारी मिळाल्यानंतर दानवे यांनी गुरुवारी प्रतिज्ञापत्र दाखल केलं. त्यानुसार, (2026 साली) दानवे यांच्या कुटुंबीयांची मिळून 2.36 कोटी रुपयांची जंगम संपत्ती तर 5.06 कोटी रुपये किंमतीची स्थावर मालमत्ता आहे. कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मिळून एकूण 8.96 कोटी रुपयांचे कर्ज आहे. पत्नी अनुराधा यांच्या नावावर एक मर्सिडीज बेन्झ गाडीही आहे

सिद्दीकी यांच्या संपत्तीत चौपट वाढ

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या संपत्तीतही गेल्या काही वर्षांत वाढ झाल्याचे समोर आले आहे. झिशान सिद्दीकी यांनी 2024 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती, तेव्हा 5.20 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता व 31.69 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे, त्यांनी त्यावेळी जाहीर केले होते. तर आपल्यावर 8.77 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

मात्र 2026 मध्ये त्यांच्या संपत्तीत 2 वर्षांत जवळपास चौपटवाढ झाल्याचे दिसून आले आहे. सिद्दीकी यांनी 21.17 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता जाहीर केली असून स्थावर मालमत्तेत मात्र काहीशी घट होऊन 28.74 कोटी रुपयांची मालमत्ता नावावर असल्याचे स्पष्ट केले आहे. तर, त्यांच्या कर्जातही काहीशी घट होऊन कर्जाची रक्कम आता 8.69 कोटी रुपयांचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!