नाशिक : बळीराजासमोर (Farmer) आता आणखी एक नवं संकट उभे राहीले आहे. शेतकऱ्यांचा जोडधंदा असलेल्या पशूपालनात एका नव्या विषाणूने शिरकाव केला आहे. जनावरांना लंपी (lampivirus) विषाणूची लागण होत असल्याचे समोर आले आहे. देशातील विविध राज्यांमध्ये लंपी विषाणूने कहर केला असून लंपी विषाणूने अनेक जनावरांचा जीव घेतला असून मृत्यूचा (Death) खच पडल्याचे समोर आले आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील राज्यांमधील अनेक जिल्ह्यात असे विषाणूची लागण झालेली जनावरे आढळून येत आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पांगरी आणि दुसंगवाडी या दोन्ही गावात लंपी या नव्या विषाणूने शिरकाव केला आहे. नाशिकमध्ये या विषाणूचा शिरकाव झाल्याने प्रशासन सतर्क झाले असून तातडीने प्राथमिक उपचार करण्याच्या सूचना पशू वैद्यकीय विभागाला जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी दिले आहे.