AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रदेशाध्यक्षांनाच माहीत नाही प्रशांत किशोर सल्लागार; दत्ता भरणे म्हणाले, आहे…

प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे, या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. प्रशांत किशोर हे आमचे राजकीय सल्लागार असल्याचं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हे मलाच माहिती नाही असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

प्रदेशाध्यक्षांनाच माहीत नाही प्रशांत किशोर सल्लागार; दत्ता भरणे म्हणाले, आहे...
Dattatray BharneImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 07, 2026 | 6:31 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे,  राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना या भेटीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हे मलाच माहिती नाही, असं तटकरे यांनी म्हटलं आहे. प्रशांत किशोर यांना राजकीय सल्लागार नेमल्याची माझ्याकडे माहिती नाही, पण जर त्यांची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती झाली असती तर मला त्याची नक्की माहिती असती, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

परंतु दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी मंत्री दत्तात्राय भरणे यांनी मात्र प्रशांत किशोर हे आमचे राजकीय सल्लागार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान सुनील तटकरे यांच्याविरोधात पक्षात नाराजी असल्याची देखील चर्चा सुरू आहे, यावर देखील यावेळी भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनील तटकरे आमचे नेते आहेत, कुठेही पक्षात त्यांच्याविरोधात नाराजी नाही. भाजपचीही कुठेही नाराजी नाही. भाजप आमचा मोठा भाऊ आहे, असं यावेळी भरणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज शेतकरी कर्जमाफीचा पहिला हफ्ता हा शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. यावर देखील यावेळी कृषीमंत्री भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचा पहिला हफ्ता जमा करण्यात आला आहे.  ५ हजार कोटींपेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. टप्प्याटप्प्याने लाभ मिळणार आहे. आजपासून रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. कगदपत्रांची पूर्तता होईल, तसे पैसे जमा करण्यात येतील, या कर्जमाफीचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना होणार आहे, अशी माहिती यावेळी दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...