परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन?; दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात अजित पवारांचे मोठे वक्तव्य

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये  शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता दहावी बारावीच्या परीक्षा होणार का? परीक्षा झाल्यास त्या ऑनलाईन होणार की ऑफलाईन असे अनेक प्रश्न आता विद्यार्थ्यांसोबतच पालकांना देखील पडले आहे. यावर आता खुद्द अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन?; दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात अजित पवारांचे मोठे वक्तव्य
अजित पवार

पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या (Corona) रुग्णांमध्ये वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये  शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता दहावी बारावीच्या परीक्षा होणार का? परीक्षा झाल्यास त्या ऑनलाईन होणार की ऑफलाईन असे अनेक प्रश्न आता विद्यार्थ्यांसोबतच पालकांना देखील पडले आहे. यावर आता खुद्द अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे (Ajit Pawar) ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. परीक्षेसंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, दाहवी आणि बारावीच्या परीक्षा या व्हायलाच हव्यात, तसेच त्या ऑनलाईन घेऊन चालणार नाही. त्या ऑफलाईनच व्हायला हव्यात असे माझे मत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी काय निकाल लागला हे सर्वांनीच पाहिले. त्यामुळे गेल्या वर्षीची पुनावृत्ती टाळायची असेल तर परीक्षा या ऑफलाईनच घेतल्या जाव्यात असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

कोरोना नियमावलीमध्ये बदल नाही

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नांची उत्तर दिली. राज्यात सध्या कोरोना वाढत आहे. नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यास संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढू शकतो. राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. रज्या सरकारने जी नियमावली जाहीर केली आहे, त्यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे पवार यांनी म्हटले. तसेच जे नागरिक कोरोना नियमांचे उल्लंघ करतील त्यांच्यावर देखील कडक कारवाईचा इशारा यावेळी पवार यांनी दिला आहे.

मुलांच्या लसीकरणाला उत्तम प्रतिसाद

यावेळी बोलताना त्यांनी 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत देखील माहिती दिली. राज्यात मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष: ग्रामीम भागांमध्ये लसीकरणाचे प्रमाण चांगले असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी बुस्टर डोस देण्यात येत असून, बुस्टर डोस घेण्यासाठी पहिल्या डोसमध्ये 9 महिन्यांचे अंतर ठेवावे असे देखील यावेळी पवार म्हणाले.

संबंधित बातम्या

वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक, रविवारी केंद्र सरकारविरोधात राज्यभरात आंदोलन, मोदींना पाठवणार सिलिंडर

VIDEO: भ्रष्टाचार करायलाही अक्कल लागत नाही, पालिकेत स्थायी समिती अध्यक्षांची ‘वाझेगिरी’; आमदार साटम यांची टीका

Actor Kiran Mane | साहेबांसमोर खरा माणूसच बसू शकतो…पवार भेटीनंतर काय म्हणतायत अभिनेते माने?

Published On - 7:24 pm, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI