AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडमध्ये आता आणखी एका सरपंचाच कुटुंब दहशतीखाली, खंडणी मागत दिली जीवे मारण्याची धमकी

बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे, बीडमधील एका महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी करण्यात आली आहे, तसेच जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे.

बीडमध्ये आता आणखी एका सरपंचाच कुटुंब दहशतीखाली, खंडणी मागत दिली जीवे मारण्याची धमकी
| Updated on: Jan 18, 2025 | 5:33 PM
Share

बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. मस्साजोगचं प्रकरण ताजं असतानाच आता एका महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी करण्यात आली आहे. एवढंच नाही तर जीवे मारण्याची देखील धमकी देण्यात आली आहे. त्रासाला कंटाळलेल्या या महिला सरपंचाकडून आता आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचं या महिलेनं म्हटलं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मस्साजोग येथील सरपंचाची हत्या प्रकरण ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर (पाटोदा) येथे उघडकीस आला आहे. महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी करत  जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे या महिलेचं कुटुंब दहशतीच्या सावटाखाली आहे. त्रासाला  कंटाळलेल्या या महिला सरपंचाकडून आता थेट आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.

मंगलाबाई राम मामडगे असं या महिला सरपंचाच नाव आहे. त्या अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर (पाटोदा) गावाच्या सरपंच आहेत. त्यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली आहे. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. या महिलेनं आता या प्रकरणात आत्मदहनाचा इशारा दिला आहे. न्याय न मिळाल्यास आत्मदहन करू असं मंगलाबाई यांनी म्हटलं आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी  बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना एक खंडणी प्रकरणाचं कनेक्शन देखील समोर आलं होतं. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे सध्या बीडकडे लागलं आहे. मात्र असं असताना देखील आता आणखी एक महिला सरपंचाने आपल्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. तसेच आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.  जर न्याय मिळाला नाही तर आपण आत्मदहन करू असा इशारा देखील या प्रकरणात देण्यात आला आहे.

Follow Us
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?