AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…तर गिरीश महाजन मला इथेच चित करतील’; फडणवीस नेमकं असं का म्हणाले?

जळगाव जिल्ह्यातल्या शेंदुर्णी येथील सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस बोलत होते.

'...तर गिरीश महाजन मला इथेच चित करतील'; फडणवीस नेमकं असं का म्हणाले?
| Updated on: Feb 16, 2025 | 7:01 PM
Share

जळगाव जिल्ह्यातल्या शेंदुर्णी येथील सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त गौरव ग्रंथ प्रकाशन व भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील देखील उपस्थित होते.

नेमकं काय म्हटलं फडणवीस यांनी? 

आज खरं म्हणजे एका अतिशय ऐतिहासिक अशा संस्थेमध्ये येण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी संजय भाऊ तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो. ऐतिहासिक याकरता की स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर ही संस्था स्थापन झाली आणि त्या काळामध्ये स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्याबद्दल गावाला दंड झाला,  तो दंड न्यायालयात माफ करण्यात आला.  आता  त्या दंडाच्या पैशातून काय करायचं तर त्यातनं आपल्या गावातल्या मुलांना, मुलींना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे याकरता त्या काळामध्ये आदरणीय गरुड साहेबांनी या संस्थेची स्थापना केली, असं फडणवीस यांनी म्हटलं.

पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी पाणी असेल विजेच्या समस्या असतील तुम्ही डीपी मागितल्या पाहिजे. आम्ही तेवढे डीपी तुम्हाला देऊ. दुसरं तुम्ही सांगितलं की येथील काही शेतकऱ्यांनी सोलरसाठी पैसे भरले आहेत. मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या पंधरा दिवसांमध्ये त्याला कनेक्शन मिळेल. आमच्याकडे कनेक्शनची कुठलीही कमतरता नाही.   365 दिवस दिवसाचे बारा तास वीज आम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहोत, त्यासोबत आपल्याला कल्पना आहे की आम्ही शेतकऱ्यांकडून आता विजेचे पैसे घेत नाहीत,  पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज आम्ही देत राहणार आहोत. शेतकऱ्यांचं  कल्याण हाच आमचा या सरकारचा हेतू आहे. त्यामुळे त्यांना मोफत वीज देण्यात येत आहे. असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गिरीश महाजन यांच्या कुस्त्यांच्या कार्यक्रमाला जर मी उशिरा गेलो तर गिरीश महाजन मला इथेच चित करतील असं मिश्किल विधान देखील यावेळी फडणवीस यांनी केलं.

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.