बीडचं झेंगाट भारी, एकाची नाही 8 जणांची नवरी, वरात थेट ठाण्याच्या दारी !

पोलिसांनी महिला व पुरूष या दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडून अटक केली आहे. (fake marriage with eight people took ransom, man with woman caught red handed in beed)

बीडचं झेंगाट भारी, एकाची नाही 8 जणांची नवरी, वरात थेट ठाण्याच्या दारी !
आठ जणांशी बनावट विवाह करून खंडणी उकळली

बीड : पैसे उकळण्यासाठी कोण काय उपद्व्याप करेल, याचा नेम नाही. बीड जिल्ह्यात एका बंटी-बबलीने लग्नाच्या मोहजालात अडकवून अनेकांना गंडा घातल्याचे खळबळजनक प्रकरण उजेडात आले आहे. यातील बबलीने बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचे सत्र सुरु ठेवले होते. तिला याकामी साथ देणाऱ्या पुरुषाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. एक-दोन नव्हे तर तब्बल आठ जणांशी बनावट विवाह करून खंडणी उकळल्याप्रकरणी बीडमध्ये एका महिलेसह एका पुरुषाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सदर महिला आधी बनावट विवाह करुन नंतर बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देत खंडणी वसुल करीत असे. या गुन्ह्यात या महिलेसोबत एका पुरुषाचाही सहभाग आहे. पोलिसांनी महिला व पुरूष या दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडून अटक केली आहे. (fake marriage with eight people took ransom, man with woman caught red handed in beed)

असा झाला गुन्हा उघड

आष्टी तालुक्यातील शिराळ येथील एका तरूणासोबत 9 मार्च रोजी एका महिलेने विवाह केला. विवाहानंतर या महिलेने तरुणाकडे पैशांची मागणी केली. आपणास दोन लाख रूपये दे, अन्यथा आपल्याला फसवून आणून बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी महिलेने तरुणाला दिली. या प्रकारामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे तरुणाच्या लक्षात आले. यानंतर संबंधित तरूणाने थेट आष्टी पोलिसात धाव घेतली. तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत सापळा रचून खंडणी वसूल करताना महिलेस रंगेहाथ पकडले आणि या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे.

आतापर्यंत सात ते आठ जणांना ठगवले

आष्टीचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी तात्काळ तक्रारीची शहानिशा करीत सापळा रचून आरोपींवर कारवाई केली. यावेळी एक महिला व पुरूष यांनी तक्रारदार युवक यांच्याकडून मागणी केल्याप्रमाणे रोख रक्कम 50 हजार रूपये शासकीय पंचासमक्ष स्वीकारले. सदर आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी सात ते आठ युवकांसोबत लग्न लावून त्यांना खोट्या तक्रारी धमक्या देवून त्यांच्याकडून पैसे उकळले असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी तक्रारदाराच्या जबाबावरून आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (fake marriage with eight people took ransom, man with woman caught red handed in beed)

इतर बातम्या

लस टोचण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी खुर्च्यांची सोय नाही, वयस्करांचे हाल, आयुक्त पाहणीसाठी आले आणि…….

केंद्रासाठी पेट्रोल-डिझेल नुसती दुभती गाय नव्हे तर सोन्याचे अंडे देणारी कोंबडी!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI