AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलगी डॉक्टर होणार होती, तिचं गावातल्या मुलावर प्रेम होतं, प्रेम काय कुटुंबीयांनी तिचं प्रेतही सापडू दिलं नाही

कुटुंबीयांनी तीन महिन्यांपूर्वी तिची सोयरीक दुसरीकडे करुन दिली होती. वराकडील मंडळींना शुभांगीच्या या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. त्यामुळे गावात बदनामी झाल्याची भावना जोगदंड कुटुंबीयांमध्ये निर्माण झाली. त्यांनी त्या मुलीचा काटा काढण्याचा कट रचला.

मुलगी डॉक्टर होणार होती, तिचं गावातल्या मुलावर प्रेम होतं, प्रेम काय कुटुंबीयांनी तिचं प्रेतही सापडू दिलं नाही
शुभांगी जोगदंडImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 28, 2023 | 3:51 PM
Share

नांदेड : नांदेड जिल्ह्यामध्ये (Nanded News) ऑनर किलिंगचा (owner killing) धक्कादायक प्रकार समोर आलाय. जन्मदात्या बापाने २३ वर्षीय मुलीची हत्या केली. हत्या करुन मुलीचा मृतदेह जाळून टाकला. मृतदेहाची राख ओढ्यात फेकून दिली. माणूसकीला काळीमा फासणारा हा प्रकार कुटुंबीयांनीच केला. परंतु हत्येनंतर कोणताही लवलेस कुटुंबीयांना नव्हता. आपले देनंदिन उपक्रम त्यांनी सुरु ठेवले होते. एका निनावी फोनने या खुनाचे बिंग फुटले. विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा बनाव निर्माण करणारे वडील, भाऊ, मामासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

शुभांगी जोगदंड ही नांदेडच्या आयुर्वेदीक महाविद्यालयात BHMS च्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. तिचे गावातील एका तरुणासोबत प्रेम होते. परंतु हे प्रेम कुटुंबीयांनी मान्य नव्हते. तिच्या या प्रेमाला कुटुंबीयांचा विरोध होता. तिची समजूतही काढण्यात आली. त्यामुळे दोघांची काही दिवस भेटणे बंद झाले. परंतु शुभांगीच्या कुटुंबीयांनी तीन महिन्यांपूर्वी तिची सोयरीक दुसरीकडे करुन दिली होती. वराकडील मंडळींना शुभांगीच्या या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. त्यामुळे गावात बदनामी झाल्याची भावना जोगदंड कुटुंबीयांमध्ये निर्माण झाली. त्यांनी त्या मुलीचा काटा काढण्याचा कट रचला.

असा रचला कट

आपली गावात बदनामी झाली, या कारणामुळे कुटुंबियांनी २२ जानेवारी रोजी तिची हत्या केली. मुलीची हत्या करताना हात थरथरु नये म्हणून आरोपींनी मद्य प्राशन केले असल्याचे सांगण्यात येत आहे. हत्येनंतर तिचा मृतदेह खताच्या गोण्यात टाकून शेतात नेला. शेतात ज्वारीच्या पिकांत सरण रचून शुभांगीचा मृतदेह जाळून टाकला. रात्री हा प्रकार केल्यानंतर सकाळी मृतदेहाची राख २२ किलो किलोमीटर असलेल्या गोदावरी नदीत जाऊन विसर्जित केली.

कसे फुटले बिंग

हत्येनंतर आरोपी कोणाला संशय येऊ नये म्हणून नियमित कामे करत होती. आई-वडील दुचाकीवर नियमित शेतात जात होते, तर भाऊ नित्यनियमाने ग्रामदैवताच्या दर्शनाला जात होता. परंतु गावात शुभांगी दिसत नव्हती. म्हणून नांदेड जिल्ह्यातील पिंपरी महीपाल या अडीच हजार लोकवस्तीच्या गावात कुजबूज सुरु झाली. एका ग्रामस्थाने पोलिसांना फोन करुन शुभांगीचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला.

पोलिसांनी शुभांगीचे वडील जनार्दन लिंबाजी जोगदंड, भाऊ कृष्णा जोगदंड, चुलत भाऊ गिरीधारी जोगदंड, शेषराव जोगदंड, गोविंद जोगदंड व मामा केशव शिवाजी कदम यांची चौकशी केली. त्यांना पोलीस खाक्या दाखवताच खुनाची कबुली त्यांनी दिली. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ३ फेब्रवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?