पोटच्या पोराचं 5 दिवसांवर लग्न, आई-वडिलांना ट्रकने चिरडलं, औरंगाबादची काळीज पिळवटून टाकणारी घटना!

हा अपघात इतका भीषण होता की, संजय आणि मीना छानवाल यांच्या शरीराचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे | Road Accident

पोटच्या पोराचं 5 दिवसांवर लग्न, आई-वडिलांना ट्रकने चिरडलं, औरंगाबादची काळीज पिळवटून टाकणारी घटना!
हे दृश्य पाहून प्रत्यक्षदर्शींनाही भोवळ आली.

औरंगाबाद: मुलाच्या लग्नाला अवघे पाच दिवस बाकी राहिले असताना आई-वडिलांचा रस्ते अपघातात (Road Accident) दुर्दैवी अंत झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. संजय छानवाल आणि मीना छानवाल, असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. पुढच्या आठवड्यात त्यांच्या मुलाचे लग्न होते. मात्र, काळाने छानवाल कुटुंबीयांवर मोठा आघात केला आहे. (Road Accident in Aurgabad Maharashtra)

धुळे-सोलापूर महामार्गावर करोडीनजीक हा अपघात झाला. यावेळी संजय आणि मीना छानवाल दुचाकीवरुन प्रवास करत होते. तेव्हा भरधाव वेगात आलेल्या ट्रकने या दोघांना चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, संजय आणि मीना छानवाल यांच्या शरीराचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. हे दृश्य पाहून प्रत्यक्षदर्शींनाही भोवळ आली. या अपघातानंतर ट्रकचा चालक आणि क्लिनर दोघेही पळून गेले आहे. सध्या खुलताबाद पोलिसांकडून या दोघांचाही शोध घेतला जात आहे.

अवघ्या पाच दिवसांवर लग्न, पत्रिका देण्यास गेलेल्या नवरदेवाचा बाईक अपघातात मृत्यू

लग्नघटिका अवघ्या पाच दिवसांवर आली असताना नवरदेवाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. स्वतःच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या नवरदेवाला अज्ञात वाहनाने धडक दिली. या दुर्दैवी घटनेमुळे नांदेडमदील हिमायतनगर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हिमायतनगर तालुक्यातील टाकराळा इथल्या 25 वर्षीय उत्तम शिराणे या युवकाचे येत्या सात एप्रिल रोजी लग्न होते. लगीनघाई असल्याने जवळच्या नातेवाईकांना लग्न पत्रिका देण्यासाठी उत्तम मोटारसायकलवर स्वार होऊन नांदेडकडे आला होता. काल रात्री तो घरी परत आलाच नाही, त्यामुळे त्याच्या कुटुंबाने शोधाशोध सुरु केली. अखेर भोकर फाट्याजवळ उत्तमचा मृतदेह आढळून आला.

अमरावतीत नातेवाईकाला रक्तदान करुन परतताना दोघांचा मृत्यू

अमरावतीवरुन आर्वीकडे येत असताना कु-हापासून दोन किलोमीटर अंतरावर भीषण अपघात झाला. हा अपघात होता की, मिलिंद पिंपळकर(३२) आर्वी व भुषण चाफले(२४) नादंपूर(ता.आर्वी) हे दोघेही जागी ठार झाले.

भुषण चाफले व जावाई मिलिंद पिंपळकर हे दोघेही अमरावतीला आपल्या नातेवाईकांना रक्त देण्यासाठी आले होते. रक्तदान झाल्यानंतर आपल्या गाडीने ते गावी परतत होते. त्यावेळी कु-हापासून दोन किलोमीटर अंतरावर त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्यालगतच्या शेतात जाऊन धडकली. गाडीचा वेग जास्त असल्यामुळे या तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

संबंधित बातम्या :

वहिनीचं वैधव्य दूर केलं, भावाच्या मृत्यूनंतर पुतणीसाठी वहिनीशी लग्न

अवघ्या पाच दिवसांवर लग्न, पत्रिका देण्यास गेलेल्या नवरदेवाचा बाईक अपघातात मृत्यू

(Road Accident in Aurgabad Maharashtra)

Published On - 8:35 am, Sat, 3 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI