मुंबई : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी एमएमआर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका आयुक्तांना दिल्या. कोव्हिड बाधित रुग्ण नॉन-कोव्हिड खासगी रुग्णालयात आल्यास त्याला प्रथम दाखल करून त्याची प्रकृती स्थिर करून मगच इतर रुग्णालयात हलवावे, तसेच शक्य असल्यास त्यांच्यावर त्याच रुग्णालयात उपचार करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची संख्या वाढू लागल्याने शिंदे यांनी स्वतः रुग्णालयात असूनही ऑनलाईन व्हीसीद्वारे विशेष आढावा बैठक घेऊन एमएमआर क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला.