AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: संजय राऊतांवर गुन्हा दाखल करा, शिवसेनेचे थेट पोलिस आयुक्तांना निवेदन, काय आहे प्रकरण?

संजय राऊत यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 150 नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Sanjay Raut: संजय राऊतांवर गुन्हा दाखल करा, शिवसेनेचे थेट पोलिस आयुक्तांना निवेदन, काय आहे प्रकरण?
Sanjay Raut
| Updated on: Sep 12, 2025 | 5:44 PM
Share

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी नेपाळमध्ये सुरु असलेला हिंसाचार भारतात सुद्धा होऊ शकतो, असे विधान केले होते. त्यानंतर आता संजय राऊत यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 150 नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली पोलिस आयुक्तांची भेट

शिवसेना शिष्टमंडळाने आज (शुक्रवार) मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेऊन राऊत विरोधात कारवाईची मागणी करणारे लेखी निवेदन दिले. यावेळी खासदार मिलिंद देवरा, आमदार तुकाराम काते, शिवसेना सचिव संजय मोरे, माजी खासदार संजय निरुपम, उपनेत्या शीतल म्हात्रे, प्रवक्त्या ज्योती वाघमारे, सुशिबेन शहा, आशा मामेडी, संजना घाडी, सुवर्णा करंजे, शिशिर शिंदे, तृष्णा विश्वासराव आदि पदाधिकारी उपस्थित होते.

संजय राऊत यांच्यावर तातडीने कारवाई करा

भारताचा शेजारी देश नेपाळमधील तरुणाई सरकार विरोधात रस्त्यावर उतरली आहे. नेपाळ हिंसाचाराचे समर्थन करणारे आणि तशी परिस्थिती भारतात निर्माण होईल, असे देशविरोधी मत सोशल मिडियावर व्यक्त करणाऱ्या संजय राऊतवर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असे मत शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केले आहे.

संजय राऊत देशाविरोधात गरळ ओकतात – शीतल म्हात्रे

संजय राऊत सारखी व्यक्ती जे बोलते त्यामुळे शहरात बॉम्बच्या अफवा पसरणे, धमकीचे कॉल येणे असे प्रकार घडू शकतात त्यामुळे पोलीसांनी राऊत यांची चौकशी करणे आवश्यक आहे. राऊत पत्राचाळ घोटाळ्यात तुरुंगात जाऊन आलेले आहेत. राऊत हे मनोरुग्ण झाले आहेत. राऊत सातत्याने सोशल मिडियावर समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करतात, देशाविरोधी गरळ ओकतात, त्यामुळे राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे केल्याची माहिती शीतल म्हात्रे यांनी दिली आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त देवेन भारती संजय राऊतांवर कारवाई करणार का? त्यांना समज देणार की गुन्हा दाखल करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...