पुण्यानंतर जळगावतही भालचंद्र नेमाडेंविरोधात अदाखलपात्र तक्रार दाखल

| Updated on: Jan 25, 2021 | 11:18 PM

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक भालचंद नेमाडे यांच्या विरोधात जळगाव जिल्ह्यातील जामनेर पोलीस ठाण्यात आज (25 जानेवारी) दुपारी अदखलपात्र तक्रार दाखल करण्यात आली.

पुण्यानंतर जळगावतही भालचंद्र नेमाडेंविरोधात अदाखलपात्र तक्रार दाखल
Bhalchandra Nemade
Follow us on

जळगाव : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक भालचंद नेमाडे यांच्या विरोधात जळगाव जिल्ह्यातील जामनेर पोलीस ठाण्यात आज (25 जानेवारी) दुपारी अदखलपात्र तक्रार दाखल करण्यात आली. यासंदर्भात राष्ट्रीय बंजारा टायगर्सने तक्रार केली होती. लेखक भालचंद्र नेमाडे यांनी ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीत लभान गोरबंजारा समाजातील महिलांबाबत अपमानजनक आणि आक्षेपार्ह लिखाण केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलाय. विशेष म्हणजे याआधी पुण्यातही भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात अशीच एक तक्रार दाखल झालेली आहे (FIR against Writer Bhalchandra Nemade in Jamner Jalgaon).

राष्ट्रीय बंजारा टायगर्सने दिलेल्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात आक्षेपार्ह लिखाणासाठी भालचंद्र नेमाडे यांच्याविरुद्ध अदखलपात्र तक्रार नोंदवण्यात आलीय. अ‍ॅड. भरत पवार यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन ही नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांनी भालचंद्र नेमाडे यांना दिलेला ज्ञानपीठ पुरस्कारही परत घेण्याची मागणी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या पदाधिकाऱ्यांनी जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे यांना एक निवेदन दिलंय. त्यात ही मागणी केली. तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर जामनेरच्या पोलीस निरीक्षकांना देखील निवेदन देण्यात आलं.

पुस्तकाचे प्रकाशक हर्ष भटकळ यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुस्तकाचे प्रकाशक हर्ष भटकळ यांच्याविरोधात देखील गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आलीय. अ‍ॅड. भरत पवार यांच्या तक्रारीनुसार भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात अदखलपात्र तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, राष्ट्रीय बंजारा टायगर्सने भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू कादंबरीतील लिखाणाला आक्षेप घेत तक्रार केली. त्यानुसार, नेमाडे यांच्या विरोधात अदखलपात्र तक्रारीची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांना पुन्हा धमकी

ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा, आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप

आपण पाकिस्तान होत चाललो आहोत : भालचंद्र नेमाडे

व्हिडीओ पाहा :

FIR against Writer Bhalchandra Nemade in Jamner Jalgaon