ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा, आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात पिंपरी चिंचवडमधील भोसरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. (FIR writer Bhalchandra Nemade)

ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा, आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप

पुणे : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात पिंपरी चिंचवडमधील भोसरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेमाडे यांनी त्यांच्या ‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ या पुस्तकामध्ये एका समाजाबाबात आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप आहे. अ‌ॅड. रमेश राठोड यांनी ही तक्रार दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (in pune FIR filed against the writer Bhalchandra Nemade)

परखड विषयावर भाष्य करणारे आणि आपल्या लेखनीने समाजातील ज्वलंत विषयावर बोट ठेवणारे लेखक अशी नेमाडे यांची ओळख आहे. त्यांनी लिहलेल्या हिंदू या कादंबरीला साहित्य क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मात्र आता त्याच पुस्तकात आक्षेपार्ह लिखान केल्याच्या आरोप करत नेमाडेंविरोधात पुण्यातील भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. त्यांच्यावर एका समाजाबाबत आक्षेपार्ह लेखन केल्याचा आरोप तक्रारदार अ‌ॅड. रमेश राठोड यांनी केलाय. दाखल तक्रारीनुसार नेमाडेंविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अ‌ॅड. रमेश राठोड यांनी नेमाडे यांनी त्यांचे हिंदू- गण्याची समृद्ध अगडगळ हे पुस्तक मागे घ्यावे अशी मागणीसुद्धा केली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या नागरिकत्व कायद्याविरोधात (CAA) सुरु असलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हा देश पाकिस्तान होत चालला आहे, असं परखड विधान केलं होतं. या आंदोलनाविषयी बोलताना “हे अराजकतेचं लक्षण आहे आणि हे वाढतच जाणार आहे. कारण आपल्याला यातून बाहेर पडता येणं कठीण आहे. आता आपली वाटचाल अतिशय हिंसक पद्धतीने सुरु आहे, असं मला वाटतं. आपल्या देशात असं कधी नव्हतं. दुर्दैवाने आपण पाकिस्तान होत चाललो आहोत,” असे नेमाड म्हमाले होते.

संबंधित बातमी :

साहित्य संमेलन स्थळावरुन नवा वाद; कौतिकराव ठाले पाटलांच्या विधानाचा प्रतिवाद

Aurangabad | या तारखेला होणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

अहिराणी कविता, कथाकथन आणि मौखिक साहित्य, बोलीभाषेच्या जागरसाठी दिग्गजांची मांदियाळी

(in pune FIR filed against the writer Bhalchandra Nemade)


Published On - 6:43 am, Tue, 12 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI