Dombivli Fire | डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळ एका इमारतीला भीषण आग

डोंबिवली रेल्वे स्टेशन जवळील लक्ष्मी निवास इमारतीला मोठी आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

Dombivli Fire | डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळ एका इमारतीला भीषण आग
डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळ एका इमारतीला भीषण आग

डोंबिवली (ठाणे) : डोंबिवली रेल्वे स्टेशन जवळील लक्ष्मी निवास इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. लक्ष्मी निवास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक गोदाम आहे. या गोदामात ही आग लागली. या आगीचा धूर परिसरात दूरपर्यंत पसरला आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत.

नेमकं काय घडलं?

डोंबिवली पूर्वेत रेल्वे स्टेशनजवळ लक्ष्मी निवास नावाची तीन मजली इमारत आहे. या इमारतीत काही रहिवासी राहतात. तसेच स्टेशनजवळचा परिसर असल्याने या भागात अनेक कमर्शिअल कार्यालये आहेत. लक्ष्मी निवास इमारतीतही काही कमर्शिअल कार्यालये आहेत. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लाकडांचं गोदाम आहे. या गोदामातच ही भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटना दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

या आगीमागील नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तसेच आगीत काही जिवितहानी झालेली आहे का याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण आगीमुळे संपूर्ण गोदाम जळून खाक झालं आहे. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी काही गाड्या घटनास्थळी दाखल होऊ शकतात.

आग नियंत्रणात

अग्मिशमन दलाच्या जवानांनी शर्थीने प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. जवळपास तासाभराच्या आत अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. तसेच इमारतीत काही रहिवासी राहत असल्याने अनेकांना धडकी भरली होती. मात्र, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या आगीत गोदामातील लाकडे पूर्णपणे जळून खाक झाले आहेत.

घटनेचा व्हिडीओ बघा :

हेही वाचा : PM Modi Varanasi Visit : पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेलं रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर नेमकं काय?

Published On - 3:31 pm, Thu, 15 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI