तळकोकणातही कोरोनाचा शिरकाव, सिंधुदुर्गमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण

कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. आता तळकोकणातही कोरोनाने शिरकाव केला आहे (First Corona patient found in Sindhudurg).

तळकोकणातही कोरोनाचा शिरकाव, सिंधुदुर्गमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण

सिंधुदुर्ग : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. आता तळकोकणातही कोरोनाने शिरकाव केला आहे (First Corona patient found in Sindhudurg). सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला कोरोनाचा रुग्ण साडपला आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संबंधित व्यक्ती कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला संसर्ग जाला. विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीची बहिण 21 मार्चला मुंबईत गेल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे हा कोरोना संसर्गित रुग्ण आढळला आहे. त्याने 19 मार्चला आलेल्या मंगलोर एक्सप्रेसने प्रवास केला होता. या रेल्वे गाडीत एस 3 डब्यात कोरोना बाधित रुग्ण होता. मंगलोर एक्सप्रेसमधून आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वेच्या प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला याबाबत कळवले देखील होते.


रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीच्या आधारे जिल्हा प्रशासनाने कणकवली रेल्वे स्टेशनवर तपासणी देखील केली. या तपासणीनंतर सर्व प्रवाशांना होम कॉरन्टाईनच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाने मंगलोर एक्सप्रेसमधील एस 3 डब्यातून प्रवास केलेल्या सर्व प्रवाशांची माहितीही घेतली. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही योग्य त्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्या रेल्वे प्रवाशाच्या आईला खोकला असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आईला रुग्णालयात दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रेल्वेतून प्रवास केलेल्या तिच्या ‘त्या’ मुलालाही  रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर दोघांचेही रिपोर्ट पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले. याचा आज (26 मार्च) आला. यात संबंधित आईचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. त्याच्या आईसह इतर 4 जणांचे कोरोना चाचणीच अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. कोरोना पॉझिटीव्ह  रुग्ण सापडल्याने आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित रुग्ण  होम कॉरन्टाईन असल्यामुळे इतर कुणाच्या संपर्कात आला नाही. प्रवास करताना त्याच्या सोबत आलेली त्याची बहिण 21 मार्चला मुंबईला गेली आहे. जिल्हा प्रशसनाने तातडीने मुंबईच्या यंत्रणेला याची माहिती दिली. आता रुग्णाच्या बहिणीची देखील मुंबई आरोग्य यंत्रणेकडून चाचणी घेण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कर्जाचे 3 हफ्ते माफ करा, खासदार राहुल शेवाळेंची केंद्रीय अर्थमंत्र्याकडे मागणी

Corona Death | मुंबई आणखी एका महिलेचा मृत्यू, कोरोनाबाधित मृतांची संख्या 5 वर

आपल्याला लष्कराच्या मदतीची गरज येऊ नये ही सर्वांची जबाबदारी: अजित पवार

First Corona patient found in Sindhudurg

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI