Ahilyanagar Leopard News : अखेर त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात मोठे यश, वनविभागासह नागरिकांनी…
Ahilyanagar leopard killed : नरभक्षक बिबट्याने प्रचंड धुमाकूळ माजवला होता. बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय मुलीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात घटना घडली होती. त्यानंतर या बिबट्याची प्रचंड दहशत बघायला मिळाली.

गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यात बिबट्या धुमाकूळ घालताना दिसला. गावांमध्ये या बिबट्याची प्रचंड अशी दहशत बघायला मिळाली. बिबट्याच्या हल्ल्यात महिलेसह एका चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. त्या नरभक्षक बिबटयाला ठार मारण्याचे वनविभागाला आदेश देण्यात आली. नरभक्षक बिबट्याने प्रचंड धुमाकूळ माजवला. बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय मुलीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात घटना घडली होती. त्यानंतर संतप्त जमाव रस्त्यावर उतरला आणि त्यांनी थेट आंदोलन केली. मृतदेहासह नगर – मनमाड महामार्गावर रास्ता रोको केला. पोलिसांसह वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला.
आता अखेर त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात मोठे यश आलंय. काल रात्री धारणगाव शिवारात वन विभागाने मोठी कारवाई केली. गेल्या काही दिवसांपासून नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता. एकाच आठवड्यात त्याने दोन लोकांना ठार केले होते. नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलगी आणि 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. वन विभागाकडून नरभक्षक बिबट्याचा शोध सुरू होता. अखेर सहा दिवसांनंतर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात मोठे यश मिळाले.
कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात बिबटयाच्या हल्ल्यात 60 वर्षीय शांताबाई निकोले या महिलेचा मृत्यू झाला होता. परिसरातील पाच दिवसातील ही दुसरी घटना होती. अगोदरच्या घटनेत चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला होता. वनअधिकारी, वनकर्मचारी तसेच नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू होता. शेवटी बिबट्याला ठार मारण्यात आले. इतर बिबटेही जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत आहे.
नरभक्षक बिबट्या ठार मारला गेल्याने ग्रामस्थांनी आता सुटकेचा निश्वास घेतलाय. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही नागरिकांना कठीण झाले होते. प्रचंड दहशत बिबट्याची तालुक्यात बघायला मिळाली. अखेर मोठे प्रयत्न करून वनविभागाकडून या बिबट्याला ठार मारण्यात आलंय. काही बिबटे वनतारामध्ये पाठवले जातील, असेही सांगितले जात आहे.
