AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्याकडे हरीण आणि बिबट्याची पिल्ले होती, पण मंत्री झाल्यावर… गणेश नाईक यांचा मोठा खुलासा

गणेश नाईक यांनी वनमंत्री झाल्यावर पाळीव हरीण आणि बिबट्याची पिल्ले सोडल्याची कबुली दिली. वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे स्वतःच्या आवडत्या प्राण्यांनाही कसे सोडावे लागते, हे त्यांनी सांगितले. हा कायदा पाळणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांच्या अनुभवातून स्पष्ट झाले.

माझ्याकडे हरीण आणि बिबट्याची पिल्ले होती, पण मंत्री झाल्यावर... गणेश नाईक यांचा मोठा खुलासा
| Updated on: Oct 14, 2025 | 9:35 AM
Share

माझ्याकडे हरीण आणि बिबट्याची पिल्ले होती. पण वनमंत्री झाल्यावर ते सोडून द्यावे लागले असे विधान वनमंत्री गणेश नाईक यांनी केले आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे स्वतःच्या आवडत्या प्राण्यांनाही कसे दूर करावे लागते, याचा अनुभव राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना सांगितला. वनमंत्री होण्यापूर्वी आपण हरीण आणि बिबट्याच्या पिलांचे संगोपन केले होते, मात्र कायद्याचे बंधन आल्याने या वन्यजीवांना सोडावे लागले, अशी कबुली गणेश नाईक यांनी दिली होती.

गणेश नाईक काय म्हणाले?

नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात राज्य मुस्लीम खाटीक समाजाच्या वतीने एका भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना गणेश नाईक यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. माझ्यासाठी ते हरिण घेऊन आले होते. मी त्याचा सांभाळ केला होता. पण त्यानंतर वनमंत्री झाल्यानंतर आता त्याला आता ठेवू शकत नाही. म्हणून मग मला त्याला सोडून द्यावे लागेल, असे गणेश नाईक म्हणाले.

कायदा काय?

कारण वनमंत्री झाल्यानंतर कायद्याने वनप्राणी पाळणे हा गुन्हा आहे. माझ्याकडे बिबट्याची पिल्ले देखील होती. आपण त्याला प्रेमाने सांभाळू, पण कायद्यानुसार हा गुन्हा आहे. तिथे आपल्या प्रेमाला आवर घालावा लागतो. त्यामुळे वनमंत्री झाल्यावर बंधने आली, असेही गणेश नाईक यांनी सांगितले. या विधानाद्वारे गणेश नाईक यांनी वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार वन्यप्राणी पाळणे हा गुन्हा असून आपल्याला कायद्याचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, याची माहिती दिली.

कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन

वन्यजीव पाळण्याच्या आठवणी सांगून झाल्यानंतर गणेश नाईक यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना एकजुट होण्याचे आवाहन केले. आता तुम्ही चिंता करू नका. संजीव नाईक, अनंत सुतार, मनोहर पटेल, राजेश पडवी या चौघांनी आता एकत्र या आणि काम करा, असा संदेश गणेश नाईक यांनी दिला. दरम्यान वनमंत्र्यांनी स्वतःच वन्यजीव पाळल्याची आणि नंतर कायद्यामुळे त्यांना सोडून द्यावे लागले, अशी कबुली दिल्याने सध्या याबद्दलची चर्चा पाहायला मिळत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...