मालेगाव स्फोटातील आरोपी निर्दोष सुटताच पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली वेगळी थिअरी, अमित शाह यांच्याकडे बोट दाखवत म्हणाले…

पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे, शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला असून, मुंबईमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आहे, या आंदोलनावर चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मालेगाव स्फोटातील आरोपी निर्दोष सुटताच पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली वेगळी थिअरी, अमित शाह यांच्याकडे बोट दाखवत म्हणाले...
Prithviraj Chavan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 02, 2025 | 3:24 PM

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागाला, या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे.  पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्याविरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून, मुंबईत आंदोलनाला सुरुवात झाली आहे, दरम्यान यावर आता पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण? 

आंदोलन प्रत्येकाचा हक्क आहे,  पण मुद्दा नेमका काय आहे? हे समजून घ्यायला हवं, मुद्दा लक्षात घ्यायला हवा. एनआयए राष्ट्रीय यंत्रणा आहे . 2014 पासून अमित शहा यांच्या निदर्शनात तपास सुरू होता. ठोस पुरावा असेल तर शिक्षा देता येते, अपुरा पुरावा सादर केल्याने शिक्षा देता आला नाही. अर्धवट माहिती घेऊ नका, मी काय म्हंटले ते ऐकूण बोला,
मी दहशतवादाला जात नसते , तो मुलांना पोरकं करतो असं म्हटलं.

हा खटला 2008 चा आहे, तत्कालीन सरकारने हा खटला एटीएसकडे दिला , त्यांनी काही लोकांना अटक केली. केंद्र सरकारने हा खटला एनआयएकडे दिला. 2014 पासून अमित शहा यांच्या निदर्शनात तपास सुरू होता. कोर्टाने सांगितले पुरावा नाही, कोर्टाने ब्लास्ट झाला हे सांगितले, पण कोणी केला हे सांगितले नाही. हे काम भारत सरकारने करायला हवे , मुद्दाम कमी पडले असे म्हणावे तर माझ्याकडेही पुरावा नाही. दहशतवाद हा दहशतवाद आहे, त्याला धर्माचे लेबल लावू नका. एकाच वेळेस हे निकाल आले हा विषय वेगळा आहे,  या दोन्ही खटल्याबाबत वरच्या न्यायालयात दाद मागायला हवी. तपास यंत्रणावर राजकीय दबाव आहे का उत्तर शोधायला हवे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की,  मालेगाव ब्लास्टबद्दल मुख्यमंत्री काही बोलणार नाही, कारण याबाबत दिल्लीचे नियंत्रण आहे. त्यांची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना बोलता येणार नाही. महाराष्ट्रात उद्योग का येत नाही, बिडची घटना का घडली? तर दोन कोटीची खंडणी दिली नाही म्हणून,  पुण्याच्या औद्योगिक प्रकल्पात देखील खंडणी सुरू आहे. खंडणीला राजाश्रय आहे.  मुख्यमंत्र्यांच्या लेव्हलला कारवाई होऊ शकते, कुठलाही गुंड राजाश्रय असल्याशिवाय रोखठोक काम करू शकत नाही. खंडणीखोरांचा बंदोबस्त फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच करू शकतात, असं यावेळी चव्हाण यांनी म्हटलं आहे.