माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या पत्नी शालिनी चव्हाणांचे वृद्धापकाळाने निधन

माजी दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या धर्मपत्नी शालिनी चव्हाण यांचे वृद्धापकाळाने पुणे येथील हॉस्पिटल मध्ये निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. शालिनी चव्हाण गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये औषध उपचार सुरू होते, पण वृद्धापकाळामुळे त्यांची प्रकृती औषध उपचारास साथ देत नव्हती.

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या पत्नी शालिनी चव्हाणांचे वृद्धापकाळाने निधन
shalini chavan

मुंबईः महाराष्ट्र राज्याचे माजी दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या धर्मपत्नी शालिनी चव्हाण यांचे वृद्धापकाळाने पुणे येथील हॉस्पिटल मध्ये निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. शालिनी चव्हाण गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये औषध उपचार सुरू होते, पण वृद्धापकाळामुळे त्यांची प्रकृती औषध उपचारास साथ देत नव्हती.

आज रात्री साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली

उपचार सुरू असतानाच आज रात्री साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा अंत्यविधी मंगळवारी दुपारी दोन वाजता त्यांच्या अनदूर येथील शेतामध्ये करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे सदस्य बाबुराव चव्हाण ही दोन मुलं आणि एक मुलगी यांच्यासह सुना नातवंडे, असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी अनेक आघाड्यांवर चव्हाण यांना साथ दिली होती, त्या कार्यकर्ते यांची मुलांप्रमाणे अत्यंत आपुलकीने आणि आस्थेने चौकशी करीत काळजी घेत होते.

कोण आहेत मधुकरराव चव्हाण?

तुळजापूरच्या राजकारणात मधुकर चव्हाण यांचं वजन आहे. 1962 मध्ये लोकल बोर्डाचे सदस्य म्हणून तुळजापूर तालुक्‍यातून मधुकरराव चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यापूर्वी ते कापडाचा व्यवसाय करत होते. 1967 मध्ये काकंब्रा गणातून विजयी झाले, त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. कालांतराने मधुकर चव्हाण तुळजापूर पंचायत समितीचे उपसभापती बनले होते. त्यानंतर 1972 मध्ये पंचायत समितीच्या सभापतीपदी त्यांची निवड झाली.

तेव्हा डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याकडून त्यांचा पराभव

1984 मध्ये कॉंग्रेसच्या वतीने उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली, मात्र तेव्हा डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 1990, 1995, 1999, 2004 , 2009 आणि 2014 अशा सलग पाच वेळा मधुकर चव्हाण तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसकडून निवडणूक लढले. 1995 मधील निवडणुकीचा अपवाद वगळता ते प्रत्येक निवडणुकीत विजयी झाले. दरम्यानच्या कालावधीत राज्य सहकारी बॅंकेचे संचालक, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, राज्य सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष, अध्यक्ष या पदावर त्यांनी काम पाहिते. सतत 11 वर्षे मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून मधुकर चव्हाण कार्यरत होते. नळदुर्ग येथील तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष आणि तुळजापूर येथील कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.

संबंधित बातम्या

‘महेश लांडगे, लक्ष्मण जगतापांच्या अनेक चुका, भाजपला फटका बसण्याची शक्यता’, भाजप नगरसेवकाचं थेट फडणवीसांना पत्र

पाटील म्हणाले, माझी जीभ घसरली, आता नवाब मलिक म्हणतात पाय घसरू देऊ नका!

Former Minister Madhukarrao Chavan wife Shalini Chavan dies of old age

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI