AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! बदलापूरमध्ये उल्हास नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू

मोठी बातमी समोर आली आहे, बदलापूरमध्ये अंगाला लागलेला रंग काढण्यासाठी उल्हास नदीमध्ये उतरलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे.

मोठी बातमी! बदलापूरमध्ये उल्हास नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 14, 2025 | 7:41 PM
Share

आज सर्वत्र होळीचा उत्साह आहे, आनंदाचं वातावरण आहे. मात्र अशा या वातावरणाला गालबोट लावणारी घटना बदलापूरमधून समोर आली आहे. अंगाला लागलेला रंग काढण्यासाठी उल्हास नदीत उतरलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, धुलिवंदन झाल्यानंतर अंगाला लागलेला रंग काढण्यासाठी ही चारही मुलं उल्हास नदीच्या पाण्यात उतरले होते.  मात्र त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं ती पाण्यात बुडाली.  आर्यन मेदर, आर्यन सिंग, सिद्धार्थ सिंग आणि ओमसिंग तोमर असे या घटनेत मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहेत.

हे चारही मुलं पोद्दार गृह संकुलातील रहिवासी होते. होळीनिमित्त धुळवड खेळल्यानंतर रंग काढण्यासाठी हे चारही मुलं आपल्या इतर मित्रांसोबत उल्हास नदीच्या काठावर आले.  ते नदीत उतरले. मात्र त्यांना नदीच्या पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बदलापूर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या मुलांचा शोध घेतला. मात्र त्यांना वाचवण्यात अपयश आलं. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.  या घटनेने बदलापूर शहरात शोककळा पसरली आहे.

कुटुंबावर दु:खाचा डोंगर 

सर्वत्र सणाचा उत्साह असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. अंगाला लागलेला रंग धुण्यासाठी ही मुलं उल्हास नदीवर गेली होती. त्यांच्यासोबत इतरही काही मुलं होती. ही मुलं नदीत उतरली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे चारही मुलांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ऐन धुलिवंदनाच्या दिवशी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...