गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी पुन्हा वाहने पेटवली

  • मोहम्मद इरफान, टीव्ही 9 मराठी, गडचिरोली
  • Published On - 14:20 PM, 9 May 2019
गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी पुन्हा वाहने पेटवली

गडचिरोली : गडचिरोलीत पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी नांगी वर काढली आहे. नक्षल्यांनी पुन्हा वाहनांची जाळपोळ केली. एटापल्ली तालुक्यातील येडसूर- कसनसूर रस्त्याच्या कामावरील एक पाण्याचा टँकर आणि मिक्सर मशिनची जाळपोळ केली. काल रात्री नक्षलवाद्यांनी हे कृत्य केलं.

पंतप्रधान  ग्राम सडक योजने अंतर्गत कारका गावालगत गेल्या काही दिवसापासून रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र सशस्त्र नक्षलवाद्यांनी मजूरांना काम बंद करण्याचे फर्मान सोडून दोन वाहनांना आग लावली. यात अमरावती येथील एका कंत्राटदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. नक्षलवाद्यांनी गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. 30 एप्रिलच्या रात्री नक्षलवाद्यांनी 30-35 वाहने पेटवून दिली होती. त्यावेळी त्यांनी रस्त्याचं काम बंद पाडलं होतं.

या गाड्यांच्या पंचनाम्यासाठी पोलिसांचं पथक घटनास्थळी जात होतं. त्यावेळी नक्षलवाद्यांनी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी भूसुरुंग स्फोट घडवल्यामुळे 15 जवानांसह खासगी गाडीचा ड्रायव्हर शहीद झाले. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा आणि लेंढारी गावादरम्यान बुधवारी 1 मे रोजी भूसुरुंगामुळे 16 जणांचा मृत्यू झाला. लेंढारी गावाजवळ वळण आहे, या ठिकाणी भूसुरुंग घडवला. हा जंगलाचा भाग आहे. आदल्या दिवशी नक्षलवाद्यांनी ठेकेदारांची वाहने जाळली होती. ही घटना पाहण्यासाठी, त्याच्या तपासासाठी पोलिसांचं पथक जात होतं. त्यावेळी भूसुरुंग स्फोट घडवला होता.

संबंधित बातम्या 

आधी गाड्या पेटवून ट्रॅप लावला, खासगी गाडीतून आलेले जवान नक्षलींच्या जाळ्यात अडकले! 

EXCLUSIVE VIDEO : गडचिरोली : जवानांचा ओपन बोलेरोतून प्रवास, गाडी मालकाशी बातचीत   

गडचिरोली : एक-दोन नव्हे तब्बल 5 ठिकाणी नक्षलवाद्यांचे सापळे  

EXCLUSIVE गडचिरोली हल्ला : जवानांना घेऊन जाणाऱ्या बोलेरो मालकाची धक्कादायक माहिती  

गडचिरोलीत जाऊन मुख्यमंत्री म्हणाले, नक्षलवाद्यांना सोडणार नाही!  

जवनांचा मृत्यू होईपर्यंत 100 नक्षलवादी थांबले, हल्ला नेमका कसा झाला?

गडचिरोली हल्ला :  जांभूळखेडा परिसरात कोबिंग अँड सर्चिंग ऑपरेशन सुरु