AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटातील धुसफूस चव्हाट्यावर, गजानन कीर्तिकरांनी पहिल्यांदाच टाकला बॉम्ब; म्हणाले, एकनाथ शिंदेंनी माझ्या अनुभवाचा…

बाळासाहेबांची शिवसेना ही काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर भरकटत होती. तो प्रवास धोकादायक होता. आम्ही सांगतही होतो. पण त्यावेळी शिंदे यांनी जो मार्ग निवडला. त्या मार्गाने जाण्याचा आणि तो भक्कम करण्याचा आम्ही पवित्रा घेतला असेही गजानन कीर्तिकर म्हणाले

शिंदे गटातील धुसफूस चव्हाट्यावर, गजानन कीर्तिकरांनी पहिल्यांदाच टाकला बॉम्ब; म्हणाले, एकनाथ शिंदेंनी माझ्या अनुभवाचा...
Gajanan Kirtikar strongly criticizes Eknath Shinde
| Updated on: Jun 07, 2025 | 3:14 PM
Share

एकनाथ शिंदे यांनी साल २०२१ मध्ये शिवसेनेत सर्वात मोठी फूट पाडली त्यावेळी त्यांच्या सोबत गेलेल्या खासदार ठाकरे यांचे सर्वात बुजुर्ग खासदार गजानन कीर्तिकर देखील गेले. मात्र आता इतक्या वर्षांनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांनी आपल्या अनुभवाचा वापर करुन घेतला नाही अशी तोफ डागली आहे. आपण बाळासाहेबांच्या सोबत काम केलेले शिवसैनिक आहोत. अडीच वर्षे मी एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे, कामाची संधी मिळाली नसल्याची खंत गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. परंतू आता मला अडीच वर्ष झाली एकनाथ शिंदे यांच्याकडे येऊन. एवढं भक्कम संघटनात्मक काम केलं. लोकाधिकार समितीच्या चळवळीत राहून काम केलं. २० वर्ष आमदार, १० वर्ष खासदार, मंत्री पाच वर्ष एवढा अनुभव असूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने माझा कोणताही उपयोग करून घेतला नाही. याची खंत माझ्या मनात आहे असे गजानन कीर्तिकर यांनी म्हटले आहे.

… ही तर शिवसैनिकांची इच्छा

राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही इच्छा राज्यातील सर्व शिवसैनिकांची आहे. बाळासाहेबांचीही होती. दोन्ही बंधूंकडे त्यांचे कॅडर आहे, फक्त एवढंच आहे की त्यांचा जनाधार आता तेवढा राहिलेला नाही. बाळासाहेबांच्या वेळेला जो जनाधार होता तो आता राहिला नाही. पण कॅडर आहे आणि बाळासाहेबांच्या पासून शिवसेनेत नेतृत्व करणारे हे आमचे दोन युवा नेते. त्यांनी एकत्र यावं ही केवळ माझीच नाही तर महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांची इच्छा आंकाक्षा आहे असेही गजानन कीर्तिकर यांनी म्हटले आहे. आम्ही केवळ इच्छाच व्यक्त करतो. त्यांनी एकत्र यावं असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेचं जे विभाजन झालं. शिंदे एका बाजूला उद्धव ठाकरे दुसऱ्या बाजूला. त्यामुळे शिवसेनेचं खूप मोठं नुकसान झालं. आज दोन बंधू एकत्र येणं गरजेचं आहेच. पण त्याचबरोबर बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. तेही या युतीत आले पाहिजे. आणि बाळासाहेबांच्या वेळची शिवसेना तयार झाली पाहिजे ही आमची मनोमन इच्छा आहे असेही ते म्हणाले.

दोन बंधू एकत्र आले तर ठाकरे ब्रँड टिकेल. शिवसेनेचं विभाजन झालं. त्याचा गैरफायदा राजकारणात घेतला गेला. त्यासाठी ठाकरे ब्रँड पुन्हा आवतरला पाहिजे. अजूनही जुने शिवसैनिक आहेत. दोन ठाकरे एकत्र आले तर त्यांच्या मागे राज्यातील शिवसैनिक उभे राहतील असे कीर्तिकर यांनी सांगितले.

हा माझा अपमान आहे

एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आणि आक्रमकत्व पत्करलं. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळलं. जनतेत जाऊन काम केलं. मी अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्याकडे आलो. माझ्यावर उद्धव ठाकरे यांच्याकडून अन्याय झाला होता. रामदास कदम सांगतायत ते बरोबर आहे. आमच्यासारख्या नेत्याला अन्याय काय वाटतो? मी 2014 मध्ये एनडीए सरकार असताना मी ज्येष्ठ आणि निष्ठावंत खासदार लोकसभेत असताना ज्युनिअर माणसाला उद्धव ठाकरेंनी मंत्री बनवलं. मंत्रीपदाचा एक कोटा मिळाला होता तेव्हा. मी २०१९ ला लोकसभेत होतो. तेव्हा शिवसेना गटाचा नेता करताना मला बाजूला करून ज्युनिअर माणसाला गटनेता केलं. हा माझा अपमान आहे असेही ते म्हणाले.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.