Ganpati Visarjan 2026 LIVE : थोड्याच वेळात लालबागच्या राजाचे विसर्जन होणार, कोळी बांधव करणार मदत

Ganpati Visarjan 2026 LIVE Coverage Mumbai, Pune and Maharashtra: लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लाखो भाविक गिरगाव चौपाटीवर जमा झाले आहेत. लालाबागचा राजाची विसर्जन मिरवणूक 20 तासांनंतर चौपाटीवर पोहोचली आहे.

Ganpati Visarjan 2026 LIVE : थोड्याच वेळात लालबागच्या राजाचे विसर्जन होणार, कोळी बांधव करणार मदत
live Blog
Image Credit source: tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Sep 26, 2026 | 10:15 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 26 Sep 2026 10:15 AM (IST)

    मुंबईच्या पवईत दुसऱ्या दिवशीही गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी रांगा

    मुंबईतील पवईमध्ये आज दुसऱ्या दिवशीही गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी रांगा लागल्या आहेत. रांगेत उभ्या असलेल्या गणेश मूर्ती या पवई तलावात विसर्जन करण्यासाठी आल्या आहेत. हे सर्व भाविक रात्री उशिरापासून आपापल्या बाप्पाला घेऊन विसर्जनासाठी निघाले होते आणि आता पवई तलावावर पोहोचले आहेत. जवळपास 10 ते 12 मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन अजून झालेले नाही, मात्र तरीही या गणेश भक्तांमध्ये बाप्पाबद्दल प्रचंड उत्साह दिसत आहे.

  • 26 Sep 2026 10:07 AM (IST)

    लालबागच्या राजाचं विसर्जन सुरू, स्थानिक कोळी बांधव मदतीला

    लालबागच्या राजाचं विसर्जन सुरू झालं आहे. लालबागचा राजा गिरगाव चौपाटीत पोहोचला आहे. स्थानिक कोळी बांधव मदतीने लालबागच्या राजाचं विसर्जन सुरू झालं आहे. यावेळी लालबागचा राजा मंडळाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित आहेत.


  • 26 Sep 2026 10:01 AM (IST)

    बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर जनसागर लोटला

    बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर जनसागर लोटला आहे. मुंबई पोलिस आणि महानगपालिकेतर्फे कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

  • 26 Sep 2026 09:56 AM (IST)

    लालबागच्या राजाचे आणि चिंचपोकळीच्या चिंतामणींचे विसर्जन

    लालबागच्या राजाचे आणि चिंचपोकळीच्या चिंतामणींचे विसर्जन होणार आहे. मुंबईच्या गिरगाव चौैपाटीवर हजारो भाविकांची गर्दी जमली आहे.

  • 26 Sep 2026 09:53 AM (IST)

    चिंचपोकळीच्या चिंतामणीचेही लवकरच विसर्जन होणार

    चिंचपोकळीच्या चिंतामणीचेही लवकरच विसर्जन होणार आहे. तराफ्यावरुन खोल समुद्राच्या दिशेने बाप्पा नेण्यात येत आहे. लवकरच बाप्पा भाविकांचा निरोप घेईल.


  • 26 Sep 2026 09:53 AM (IST)

    पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला 24 तास पूर्ण

    पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला 24 तास पूर्ण झालेत, अलका चौकातून 125 मंडळ विसर्जन घाटाकडे गेलेत, अद्याप 100 ते 150 मंडळ विसर्जन रांगेत आहेत.

  • 26 Sep 2026 09:51 AM (IST)

    चिंचपोकळीचा चिंतामणीही तराफ्यावर विराजमान

    चिंचपोकळीचा चिंतामणी ही तराफ्यावर विराजमान झाला. आता चिंतामणीचेही लवकरच विसर्जन होणार आहे. लालबागचा राजा आणि चिंतामणीचे विसर्जन पाहण्यासाठी आता भाविकांची मोठा गर्दी झाली आहे.

  • 26 Sep 2026 09:48 AM (IST)

    ढोल- ताशांच्या गजरात बाप्पाचे विसर्जन

    ज्या ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे आगमन केले होते आता त्याच ढोल ताशांच्या गजरात बाप्पा थाटामाटात खोल समुद्राच्या दिशेने निघाला आहे.

  • 26 Sep 2026 09:45 AM (IST)

    पवईमध्ये दुसऱ्या दिवशीही बाप्पाच्या विसर्जनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा

    मुंबईतील पवईमध्ये आज दुसऱ्या दिवशीही गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पवई तलावात विसर्जन करण्यासाठी ही एकाच रांगेत असलेली गणपती बाप्पांची रांग आहे. हे सर्व भाविक काल रात्री उशिरापासून आपापल्या बाप्पाला घेऊन विसर्जनासाठी निघाले आहेत आणि आता सध्या पवई तलावावर पोहोचले आहेत. सुमारे 10 ते 12 मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन अजून बाकी आहे तरीही या सर्व गणेश भक्तांमध्ये बाप्पाच्या विसर्जनाबाबत प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पोलीस आणि बीएमसीचे कर्मचारी तैनात आहेत.

  • 26 Sep 2026 09:44 AM (IST)

    लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी हायड्रोलिक तराफ्याचा वापर

    लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी आधुनिक तराफा वापरला जात आहे, हा तराफा हायड्रोलिक तराफा असून बाप्पा यावर विराजमान झाला आहे.

  • 26 Sep 2026 09:43 AM (IST)

    बाप्पाच्या विसर्जनाचा क्षण अगदी जवळ आलाय

    बाप्पाच्या विसर्जनाचा क्षण अगदी जवळ आला आहे. बाप्पा तराफ्यावर विराजमान झाले आहेत. तर बाप्पा तराफा खोल समुद्रात जाईल आणि नंतर बाप्पाचे विसर्जन होईल.

  • 26 Sep 2026 09:41 AM (IST)

    लाडक्या बाप्पाच्या निरोपासाठी मुंबईकर सज्ज

    लाडक्या बाप्पाच्या निरोपासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत, आता लाडक्या बाप्पाचे स्थानिक कोळीबांधव लवकरच विसर्जन करतील.

  • 26 Sep 2026 09:36 AM (IST)

    पंढरपुरात दुष्काळावर आज शरद पवार गटाचा मोर्चा

    पंढरपुरात दुष्काळावर आज शरद पवार गटाचा मोर्चा…शरद पवारांची मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता कमी : सूत्रांची माहिती. शरद पवार गटाच्या मोर्चासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची असणार लागणार उपस्थिती…सकाळी 11 वाजता खासदार सुळे आणि शिंदे मोर्चामध्ये होणार सहभागी…शरद पवार यांच्या ऐवजी खासदार सुप्रिया सुळे येणार पंढरपुरात

  • 26 Sep 2026 09:34 AM (IST)

    नांदेड – लोहा तालुक्यातील सोनखेड परिसरात पाहणी सुरू

    नांदेड – लोहा तालुक्यातील सोनखेड परिसरात पाहणी सुरू. शेतकऱ्याने मांडल्या व्यथा, सगळं करपून गेलंय. आता पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. मुलांची शिक्षण आम्ही कशी करायची. मी मराठवाड्यातीलच लेक आहे. मला सगळं माहिती आहे, मी शेतकरीन आहे, मी तुमच्यासाठीच येथे आले आहे. सरकार तुमच्यासोबत आहे

  • 26 Sep 2026 09:31 AM (IST)

    कळंबमधील ‘राधाकृष्ण प्युअर व्हेज रेस्टॉरंट’चा FSSAI परवाना निलंबित

    कळंबच्या ढोकी रोडवरील राधाकृष्ण प्युअर व्हेज रेस्टॉरंटवर अन्न सुरक्षा विभागाची कारवाई करण्यात आली आहे.अन्न सुरक्षा अधिकारी रोहित डी. फंदी यांच्या अचानक तपासणीत रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन आढळून आले.हॉटेलमध्ये झुरळे, माश्या आणि कीटकांचा प्रादुर्भाव तसेच निकृष्ट ड्रेनेज व्यवस्था पिण्याच्या पाण्याची प्रमाणित चाचणी नाही स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे अस्वच्छ कर्मचाऱ्यांची वार्षिक वैद्यकीय तपासणी नाही. अन्न हाताळताना ग्लोव्हज, ॲप्रन, हेडगिअरचा वापर नाही अधिक कारणांमुळे कारवाई करण्यात आली.

  • 26 Sep 2026 09:28 AM (IST)

    जुन्नरच्या शेकडो वर्षांची गणेश विसर्जनाची परंपरा आजही उत्साहात जपली

    पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात, शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या येणेरे गावात शेकडो वर्षांची गणेश विसर्जनाची परंपरा आजही उत्साहात जपली जात आहे. गावातील प्रत्येक घरातील गणपती ग्रामदैवत हनुमान मंदिरात एकत्र आणले जातात. त्यानंतर टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात सर्व गणपतींची मिरवणूक विसर्जन घाटाकडे जाते. यावेळी घाटावर सामूहिक आरती करण्यात येते. तसेच आण्णासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सेवेकऱ्यांकडून निर्माल्य संकलन केले जाते. गावातील प्रत्येक कुटुंबातील नागरिक या मिरवणुकीत सहभागी होत असून, परंपरा, श्रद्धा आणि गावचा एकोपा जपणारी येणेरे गावची गणेश विसर्जन मिरवणूक आदर्श ठरत आहे.

  • 26 Sep 2026 09:25 AM (IST)

    स्थानिक कोळीबांधवांकडून लाडक्या बाप्पाचे विसर्जन होणार

    स्थानिक कोळीबांधवाच्या मदतीने लालबागच्या राजाचे विसर्जन होणार आहे. स्थानिक कोळीबांधवांना भरती ओहोटीचा अंदाज असल्याने त्यांच्याकडून विसजर्न होईल.

  • 26 Sep 2026 09:24 AM (IST)

    दुष्काळ जाहीर करून सरकारने हेक्टरी 1 लाख रुपयाची तातडीने मदत देण्याची केली मागणी

    संपूर्ण जालना जिल्ह्यात मागच्या दीड महिन्यापासून पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांची खरीप हंगामातील सोयाबीन मका त्याचबरोबर कपाशी पिकांचं मोठं नुकसान झालंय, अंबड तालुक्यातल्या लोणार भायगाव सह आसपासच्या परिसरात सोयाबीनचे उभं पीक जळून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावंल. याच दुष्काळी परिस्थिती आणि सोयाबीन पिकांची वस्तुस्थिती सांगताना लोणार भायगाव येथील शेतकरी राजू भोजने यांना अश्रू अनावर झाल्याच पाहायला मिळालं. माझी दोन मुले संभाजीनगरला शिक्षण घेतात त्यांना आता पैसा कसा देऊ असं म्हणत आपला सगळा कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके डोळ्यादेखत करपून गेली असल्याने शेतकरी हतबल झाला असून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

  • 26 Sep 2026 09:22 AM (IST)

    स्थानिक कोळीबांधवाच्या मदतीने लालबागच्या राजाचे विसर्जन

    स्थानिक कोळीबांधवाच्या मदतीने लालबागच्या राजाचे विसर्जन होणार आहे.  बाप्पाचे विसर्जन अगदी थोड्याच वेळात होणार आहे. अनेक भाविकांचे डोषो याक्षणी पाणवलेले पाहायला मिळाले.

  • 26 Sep 2026 09:20 AM (IST)

    नाशिक महापालिकेच्या मूर्ती संकलन उपक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

    नाशिक महापालिकेच्या मूर्ती संकलन उपक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद. महापालिकेकडून तब्बल २ लाख ५२ हजार गणेशमूर्तींचे संकलन. नाशिक शहरातील सहाही विभागांत मूर्ती संकलन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. हजारो नागरिकांकडून कृत्रिम तलावांचा वापर करत गणेशमूर्तींचे विसर्जन. गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने राबवला होता मूर्ती संकलन उपक्रम. पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या आवाहनाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

  • 26 Sep 2026 09:18 AM (IST)

    बीड जिल्हा रुग्णालयाच्या दारातच मद्यधुंद टोळक्याचा गोंधळ

    बीड जिल्हा रुग्णालयाच्या दारात रात्री उशिरा मद्यधुंद अवस्थेत असलेल्या काही तरूणांचा मोठा गोंधळ सुरू होता. बराच वेळ एकमेकांना शिवीगाळ आणि झटापट सुरू होती. यावेळी सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करून तरूणांना पाठवून दिले. हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून एक व्हिडिओ समोर आला आहे. यासंदर्भात कुठलीही कारवाई झालेली नाही.

  • 26 Sep 2026 09:15 AM (IST)

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दुष्काळी दौऱ्याला सुरुवात

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दुष्काळी दौऱ्याला सुरुवात. लोहा तालुक्यातील सोनखेड परिसरातील कलंबर पाटी परिसरात सुनेत्रा पवार यांच्याकडून पाहणी. शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित

  • 26 Sep 2026 09:13 AM (IST)

    लाडक्या बाप्पाच्या निरोपासाठी कोळीबांधव सज्ज

    लालबागच्या राजाचे आधुनिक तराफ्यावर विराजमान झाले आहेत, लाडक्या बाप्पाच्या विराजमानसाठी कोळी बांधव आणि मंडलाचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. लालबागच्या राजासोबत अनेक मंडळाचे बाप्पा गिरगाव चौपाटीवर सज्ज झाले आहेत. लवकरच त्यांचेही विसर्जन होईल.

  • 26 Sep 2026 09:10 AM (IST)

    गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन तरुणांचा गोदावरी नदी पात्रात बुडाले

    गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन तरुणांचा गोदावरी नदी पात्रात बुडाले. धानोरा काळे शिवरातील घटना. दगडू उर्फ गजानन घोरपडे आणि मुंजाजी घोरपडे अशी नदी पात्रात बुडालेल्या तरुणांची नाव. घटना स्थळी पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने गोदावरीत बुडालेल्या तरुणांचा शोध सुरु..

  • 26 Sep 2026 09:07 AM (IST)

    लालबागचा राजा आता आधुनित तराफ्यावर विराजमान

    लालबागचा राजा आता आधुनित तराफ्यावर विराजमान झाला आहे, अनेक भाविक गिरगाव चौपाटीवर हजर आहेत, आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आता हे सर्व भाविक नजरा लावून बसले आहेत.

  • 26 Sep 2026 09:05 AM (IST)

    खासदार कल्याण काळे यांच्याकडून घनसावंगी तालुक्यात पिकांची पाहणी

    जालना जिल्ह्यात मागच्या दीड महिन्यापासून पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांची सोयाबीन मक्का यासह इतर पिके करपून गेली आहेत याच परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत मागच्या दोन ते तीन दिवसापासून खासदार कल्याण काळे हे शेतकऱ्यांच्या बांधावर जात पिकांची पाहणी करत आहे, याच पार्श्वभूमीवर घनसावंगी तालुक्यातल्या राजेगाव आणि आसपासच्या परिसरात खासदार कल्याण काळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या…

  • 26 Sep 2026 08:59 AM (IST)

    गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन तरुण गोदावरी नदी पात्रात बुडाले

    गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन तरुण गोदावरी नदी पात्रात बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धानोरा काळे शिवरात ही घटना घडली आहे. दगडू घोरपडे आणि मुंजाजी घोरपडे अशी नदी पात्रात बुडालेल्या तरुणांची नावे आहेत.

  • 26 Sep 2026 08:55 AM (IST)

    गिरगावच्या चौपाटीवर लालबागच्या राजाची आरती

    20 तासांनंतर लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचली आहे. लाखो भाविक बाप्पाला निरोप देण्यासाठी दाखल झाले आहेत. आता बाप्पाची आरती सुरु आहे.

  • 26 Sep 2026 08:48 AM (IST)

    कोळी बांधन विसर्जनासाठी बोटी घेऊन समुद्रात सज्ज

    लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी कोळी बांधन सज्ज झाले आहेत. अनेक बोटी घेऊन कोळी बांधव समुद्रात सज्ज झाले आहेत. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अनंत अंबानी देखील उपस्थित असल्याचे दिसत आहे.

  • 26 Sep 2026 08:42 AM (IST)

    गिरगाव चौपाटीवर 34403 गौरी गणपतीचे विसर्जन

    आज पहाटे 6 वाजेपर्यंत गिरगाव चौपाटीवर 6235 सार्वजनिक गणपती, 27615 घरगुती गणपती आणि 553 गौरींचे विसर्जन झाले. गिरगाव चौपाटीवर एकूण 34403 गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

  • 26 Sep 2026 08:38 AM (IST)

    चिंचपोकळीच्या चिंतामणीची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवर

    लालबागच्या राजाच्या पाठोपाठ चिंचपोकळीच्या चिंतामणीची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचली आहे. लाखो भाविक गिरगाव चौपाटीवर बाप्पाला निरोप देण्यासाठी जमले आहेत.

  • 26 Sep 2026 08:36 AM (IST)

    लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवर विसर्जन मिरवणूक

    जवळपास 20 तासांनंतर लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुक गिरगाव चौपाटीवर पोहोचली आहे. लवकरच राजाचे विसर्जन होणार आहे.

अनंत चतुर्दशीला साश्रूनयनांनी लाडक्या बाप्पााला निरोप देण्यात आला. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर लाखो भाविकांनी गर्दी केली. त्यासाठी मुंबई महापालिका आणि पोलिसांकडून जय्यत तयारी केल्याचे दिसत आहे. मुंबईतील नवसाला पावणारा अशी ओळख असलेल्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आता गिरगाव चौपाटीवर पोहोचली आहे. जवळपास 20 तासांनंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला आहे.

अधिकृत माहितीनुसार, आज समुद्राला पहिली ओहोटी पहाटे ०५:२२ वाजता आली आहे. त्यावेळी पाण्याची पातळी केवळ ०.९७ मीटर इतकी होती. ओहोटीच्या काळात समुद्राची पातळी खूप खाली जाते. त्यामुळे विसर्जन करण्यासाठी आवश्यक असलेली पाण्याची खोली उपलब्ध होत नाही. गिरीगाव चौपाटी किंवा गिरगाव चौपाटीसारख्या ठिकाणी गणपती विसर्जन करताना पाण्याची पातळी पुरेशी असावी लागते. ओहोटी असल्यास मूर्ती समुद्रात सोडणे कठीण होते आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनेही धोका निर्माण होतो. आता लालबागच्या राजाचे विसर्जन कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दुष्काळ दौऱ्यावर आहेत. लोहा तालुक्यातील दुष्काळ सदृश्य भागाची त्या पाहणी करणार आहेत. सकाळी 9 वाजता त्यांच्याकडून पिकांची पाहणी केली जाणार आहे. सकाळी 8 वाजता नांदेड विमानतळावर सुनेत्रा पवार पोहोचणार आहेत. जवळपास दोन महिन्यापासून पाऊस नसल्याने पीक करपली आहेत. शेतकरी राजा चिंतेत आहे. मोठे संकट उभे आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुष्काळ दौऱ्यावर होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us