AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautami Patil : गौतमी पाटील म्हणजे चालता बोलता डान्सबार, नेत्याची घसरली जीभ; कुणी केली टीका?

नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षाचालक जखमी झाले, मात्र त्यांना मदत न केल्याने पुण्यात तीव्र संताप उसळला आहे. गनिमी कावा संघटनेने निषेध करत गौतमीला 'चालता बोलता डान्सबार' म्हटले. जखमी रिक्षाचालकाच्या मुलीने न्यायासाठी हायकोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे, कारण गौतमीने नैतिक जबाबदारी पाळली नाही असा आरोप आहे.

Gautami Patil : गौतमी पाटील म्हणजे चालता बोलता डान्सबार, नेत्याची घसरली जीभ; कुणी केली टीका?
गौतमी पाटील कार अपघात प्रकरण चांगलंच गाजतंय
| Updated on: Oct 07, 2025 | 2:06 PM
Share

नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारचा गेल्या आठवड्यात झालेला अपघात अजूनही गाजतोय. तिच्या कारने एका रिक्षाला धडक दिली, ज्यामध्ये रिक्षाचालक जबर जखमी झाला. मात्र त्याची काहीही मदत करण्याऐवजी कालचालक पळून गेला, नंतर त्याची कारही तिथून उचलण्यात आली. हे प्रकरण चांगलंच तापलं असून सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. गौतमीलाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र एवढं सगळं होऊनही कारची धडक बसून जखमी झालेले रिक्षाचलक सामाजी मरगळे यांना मदत करण्यासाठी गौतमी काही पुढे आली नाही. त्याच्या उपचारांचा खर्चही तिने उचलला नाही.

यामुळे पुणेकर चांगलेच संतापले असून शहरात गौतमी पाटील विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. गनिमी कावा संघटनेतर्फे पुण्यातील बालगंधर्व चौकात गौतमी पाटीलच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. रिक्षाचालकाची विचारपसू केली नाही, उपचारांचा खर्चही उचलला नाही, त्यामुळेच गनिमी कावा संघटनेतर्फे गौतमी पाटीलचा निषेध व्यक्त करण्यात आला. मात्र गनिमी कावा सेवा संघटनेच्या अध्यक्षांनी तिच्यावर टीका करत खरपूस शब्दांत तिचा समाचार घेतला. टीका करताना त्यांची जीभही घसरल्याचे दिसून आले.

गौतमी पाटील म्हणजे चालता बोलता डान्सबार

पुण्यातील बालगंधर्व चौकात गौतमी पाटील विरोधात आंदोलन करण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी गौतमी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तसेच तिच्या पोस्टरला जोडेही मारण्यात आले. यावेळी गनिमी कावा संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे यांनी गौतमीवर जोरदार टीका केली. ” गौतमी एक कलाकार आहे. नैतिक जबाबदारी घेऊन तिने जखमी झालेल्या रिक्षा चालकाला मदत करावी.” अशी मागणी त्यांनी केली. गौतमी पाटील म्हणजे चालता बोलता डान्सबार आहे अशा शब्दांतही त्यांनी टीका केली. ” गौतमी पाटील त्या जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबाला मदत करणार नसेल, तर आम्ही राज्यभरात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही” असा इशारहाही वाघमारे यांनी दिला.

आम्ही हायकोर्टात जाणार

या आंदोलनास जखमी रिक्षाचालक सामाजी मरगळे यांची मुलगी अपर्णही उपस्थित होती. आम्हाला न्याय हवा अशी मागणी तिने केली. पोलिसांनी जरी गौतमी पाटीलला क्लीनचीट दिली असली तरी आम्ही हायकोर्टात जाणार आहोत असे ती म्हणाली. पोलीस कायदेशीर कारवाई करणार नाहीत. कारचा अपघात झाल्यानंतर गौतमी पाटील हिने आमच्याशी कोणताही संपर्क साधला नाही. खरंतर संपर्क साधणं, मदतीचा हात पुढे करणं ही गौतमी पाटीलची नैतिक जबाबदारी होती, मात्र तिने ती पाळली नाही अशा शब्दांत अपर्णाने गौतमीवर टीकास्त्र सोडलं.

Gautami Patil : गौतमी पाटीलचं काही खरं नाही, सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय? पुणे पोलिसांनी उचललं मोठ पाऊल

काय आहे प्रकरण ?

30 सप्टेंबरच्या रात्री वडगाव बुद्रुक परिसरातील एका रिक्षाला गौतमी पाटीलच्या भरधाव कारने धडक दिली. त्यामध्ये रिक्षाचालकाला सामाजी मरगळे गंभीर जखमी झाले. कारचालक मात्र मदतीसाठी न थांबता तसाच पळून गेला, नंतर ती कारही तेथून हटवण्यात आली. मात्र रिक्षाचालक मरगळे यांना बराच वेळ मदत मिळाली नाही. अखेर बऱ्याच वेळाने स्थानिकांनी त्यांना उठवत उपचारांसाठी रुग्णालयात नेले. अपघात झाला ती कार गौतमीच्या नावे असून आता याप्रकरणात अधिक तपास सुरू आहे. गौतमी पाटीलला अटक करण्याची मागणीही करण्यात आली होती.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.