AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाविकासआघाडीतील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध, त्यामुळे आरक्षण गेले’

तीन पक्षाचे सरकार असल्याने त्यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वादविवाद आणि मतभिन्नता आहे. | Girish Mahajan Maratha Reservation

'महाविकासआघाडीतील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध, त्यामुळे आरक्षण गेले'
भाजप नेते गिरीश महाजन
| Updated on: May 29, 2021 | 1:35 PM
Share

जळगाव: महाविकासआघाडीतील अनेक मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध होता. त्यामुळेच हे आरक्षण गेले, असा आरोप भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला. ते शनिवारी जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (BJP leader Girish Mahajan on Maratha Reservation)

राज्यात भाजपचे सरकार होते त्यावेळी आम्ही सर्व तांत्रिक बाबी तपासून देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. ते उच्च न्यायालयात ही टिकले. दुर्दैवाने आमचे सरकार गेले आणि महाविकासआघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडू शकले नाही. त्यामुळे आरक्षण गेले, त्यामुळे त्याला भाजप जबाबदार आहे असे म्हणता येणार नसल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

आघाडी सरकार आणि वकील आपली बाजू मांडण्यास कमी पडले. तसेच तीन पक्षाचे सरकार असल्याने त्यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वादविवाद आणि मतभिन्नता आहे. मंत्रिमंडळातील जवळपास अर्धे मंत्री या आरक्षणाच्या विरोधात आहेत. ते आरक्षण देऊ नको असे म्हणत आहेत. त्यामुळेच आरक्षण गेल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला.

संभाजीराजे छत्रपतींचा सरकारला अल्टिमेटम

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी ठाकरे सरकारला 6 जूनपर्यंतची वेळ दिली आहे. संभाजीराजे यांनी पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत. या मागण्या 6 जूनपर्यंत पूर्ण झाल्या नाहीतर 7 जूनपासून राज्यभरात मराठा समाज रस्त्यावर उतरले, असे संभाजीराजे यांनी सांगितले होते.

मराठा आरक्षणाच्या हुकूमाची पाने मोदींच्याच हाती: संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या हातात टोलवला आहे. मराठा आरक्षणाची हुकूमी पानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हाती आहेत. त्यांनीच ही पानं टाकावीत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी दिलेल्या इशाऱ्याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे उत्तर दिलं. महाराष्ट्रातील प्रत्येक नेता संभाजी छत्रपती यांच्या मताशी सहमत आहे. त्यामुळे सर्व उठून मोदींकडे जाऊया. त्यात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असा विषय नाही. सर्वांनीच मोदींना भेटलं पाहिजे. कारण मोदींच्या हातीच आता हुकूमाची पानं आहेत. त्यांनीच ती टाकावी, असे राऊत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

मराठा समाजानं हक्काचं मागितले तर काँग्रेसला राग का येतो? भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकरांचा सवाल

निर्णय घेताना समाजाचा विचार करा, स्वार्थ पाहू नका; प्रसाद लाड यांचे संभाजीराजेंना आवाहन

राजे, मराठा आरक्षणाचा विषय वाटेल तसा वापरायला तुम्हाला ठेका दिला नाही; निलेश राणेंची टीका

(BJP leader Girish Mahajan on Maratha Reservation)

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.