सोनं तूर्तास स्थिर, जाणून घ्या नाशिक सराफातले भाव

नाशिकच्या सराफा बाजारात रविवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47900 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46400 रुपये नोंदवले गेले.

सोनं तूर्तास स्थिर, जाणून घ्या नाशिक सराफातले भाव
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 1:01 PM

नाशिकः नाशिकच्या सराफा बाजारात रविवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47900 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46400 रुपये नोंदवले गेले.

नाशिकच्या सराफा बाजारात गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात मोठी उलाढाल झाली. अनेकांनी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून सोने गुंतवणुकीस प्राधान्य दिले. दसऱ्याचा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो. या दिवशी कोट्यवधी रुपयांची उलाढाल नाशिकमध्ये झाली. दिवाळी दोन दिवसांवर आली आहे. दिवाळीच्या पाडव्यादिवशी अनेकजण सोने खरेदी करायला प्राधान्य देतात. दिवाळीच्या चारी दिवसांतही सराफा बाजारात मोठी गर्दी असते. ते पाहता आता व्यापाऱ्यांचे डोळे येणाऱ्या दिवाळी सणाकडे लागले आहेत. सोबतच येत्या काळात सोन्याचे भाव वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नाशिकच्या सराफा बाजारात 1 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 48,810, तर बावीस कॅरेट सोन्याचे दर हे 45,590 होते. त्या नंतर या दरात घसरणच पाहायला मिळाली. मात्र, आता या दरात किरकोळ चढ-उतार होताना दिसत आहे. सराफा बाजारात मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 49850 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47800 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 68000 रुपये नोंदवले गेले. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47800 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46300 रुपये नोंदवले गेले. चांदी किलोमागे 67500 रुपये नोंदवली गेली. गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48400 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46500 रुपये, तर चांदी किलोमागे 67500 रुपये नोंदवली गेली. शनिवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47900 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46400 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 65000 रुपये नोंदवले गेले. रविवारीही हेच दर होते, अशी माहिती दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी दिली.

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

‘गुगल पे’वर खरेदी करा सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्करावी लागणार नाही.

नाशिकच्या सराफा बाजारात रविवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47900 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46400 रुपये नोंदवले गेले. – गिरीश नवसे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन

इतर बातम्याः

एकाच दिवशी तब्बल 24 लाखांचे वीजबिल भरून जळगावचे 13 शेतकरी कृषिपंप थकबाकीतून मुक्त

शेतकऱ्यांना दिलासा; नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या 10 नव्हे फक्त 3 दिवस बंद

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.