Murder | प्रेम केलं म्हणून संदीपचा जीव गेला? काठीनं जीव जाईपर्यंत संदीपला मारलं, उपचारादरम्यान दगावला!

गोंदियातल्या सालेकस तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये संदीप मनोहर धमगाये या 28 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली असून याप्रकरणी आता पोलिसांतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Murder | प्रेम केलं म्हणून संदीपचा जीव गेला? काठीनं जीव जाईपर्यंत संदीपला मारलं, उपचारादरम्यान दगावला!
प्रातिनिधीक फोटो

गोंदिया : गोंदियातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. आधी या तरुणाला काठीनं मारहाण करण्यात आली होती. जीव जाईपर्यंत जबर मारहाण या तरुणाला करण्यात आली. या त गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठीही दाखल करण्यात आलं होतं. मात्र अखेर उपचारादरम्यान, गंभीर जखमी तरुणाचा अंत झाला असल्यामुळे अखेर आता या मारहाणीच्या प्रकरणाला हत्याकांडा वळण लागलंय. या घटनेमुळे संपूर्ण गोंदिया हादरुन गेलाय.

प्रेमप्रकरणाला जातीचं वलय?

गोंदियातल्या सालेकस तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये संदीप मनोहर धमगाये या 28 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली असून याप्रकरणी आता पोलिसांतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोंदिया पोलिसांनी हत्यप्रकरणाची गंभीर दखल घेत तिघांना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, प्रेमप्रकाराच्या वादातून हे हत्याकाडं घडल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.

संदीप धमगाये हा तरुण सालेकसा या गावातून संध्याकाळच्या सुमारास निघाला होताय निंबा इथं जात असताना याच गावातील चार लोकांनी संदीपवर जीवघेणा हल्ला केला. त्याला काठीनं जबर मारहाणा करण्यात आली आहे. सालेकसा हा अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात असलेला परिसर आहे. चौघांनी जीव जाईपर्यंत संदीपला काठीनं तुडवलं होतं. त्याच्या हाता-पायावर आणि पाठीवर जबर मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत 28 वर्षांचा संदीप गंभीररीत्या जखमी झाला बोा. निंबा गावात राहणाऱ्या एका कुटुंबातील मुलीसोबत संदीपचं प्रेम होतं, असं सांगितलं जातंय. या प्रेमप्रकरणातूनच संदीपवर हल्ला झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, आता आंतरजातीय प्रेम प्रकरणातून संदीपची हत्या झाल्याचंही बोललं जातंय.

संशयित पोलिसांच्या ताब्यात

गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या संदीपला तत्काळ सालेकसा इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचारही सुरु होता. मात्र उपचारादरम्यान संदीपनं प्राण सोडलाय. त्यांच्या नातोवाईंकनी या संपूर्ण घटनेवरुन तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोस्टमॉर्टेम झाल्यानंतर संदीपच्या नातेवाईंकांनी त्याचा मृतदेह पोलीस स्थानकासमोर ठेवला होता. या प्रकरणी कठोरातली कठोर शिक्षा आरोपींना व्हावी, अशी मागणी संदीपच्या कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी गिरवलाल उपराडे आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकूल ही पुढील तपास करत आहेत.

इतर बातम्या –

माझं लग्न झालंय, तू मला विसर, ब्रेकअप केलेल्या प्रेयसीवर प्रियकाराचा Acid Attack, पण जखमी झाली सासू!

स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय, छाप्यात दहा जणी सापडल्या, ‘चौघीं’चं झालेलं लिंगबदल

कुऱ्याडीनं वार करुन हत्या! गोंदियातल्या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्याचा कुणी घेतला जीव?


Published On - 7:12 pm, Sun, 9 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI